मुंबई

बेरोजगारीने ‘मजूराचा’ शिक्का

CD

बेरोजगारीने ‘मजुराचा’ शिक्का
तलासरीतील हजारो तरुणांना गुजरातमध्ये जाण्याची वेळ
महेश भोये ः सकाळ वृत्तसेवा
तलासरी, ता. १५ ः महाराष्ट्राचा शेवटचा तालुका असलेल्या तलासरी तालुका राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा बळी ठरला आहे. स्थानिक पातळीवर रोजगार प्रोत्साहन, उद्योग पुनरुज्जीवन आणि प्रशिक्षण केंद्रे नसल्याने हजारो तरुणांवर ‘मजूर’ असा शिक्का बसला आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतचा पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुका बेरोजगारीच्या भीषण संकटातून जात आहे. शेती, किरकोळ व्यवसायाशिवाय इतर पर्याय नसल्याने हजारो युवक, महिलांना प्रदेशांमध्ये कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. रोजगार, शिक्षण आणि शासनाच्या योजनांचा अभावाने तलासरीचा तरुण आपल्या मातीत स्थिर रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक उद्योगविकास, कौशल्य प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
---------------------------------------------
स्थलांतराची कारणे -
सर्वाधिक रोजगार गुजरातला ः तलासरीतील तरुण प्रामुख्याने वापी, उमरगाव, सुरत, सिल्वासा, दादरा, खानवेल येथील औद्योगिक पट्ट्यांमध्ये मजुरी करतो. पुरुष प्लॅस्टिक, केमिकल, स्टील, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक तर महिला गारमेंट, पॅकेजिंग, धागा उद्योग, इमिटेशन ज्वेलरी क्षेत्रांत काम करतात.
----------------------
स्थानिक उद्योगांचा ऱ्हास - एकेकाळी तलासरीत कार्यरत असलेले दुग्ध डेअरी प्रकल्प, कोलंबी प्रकल्प, सूक्ष्म उद्योग रोजगार देत होते, मात्र आता उद्योग बंद पडल्याने शेकडो कुटुंबे बेरोजगार झाली आहेत. शासनाच्या नवीन प्रकल्पांचा अभाव आणि गुंतवणुकीकडे दुर्लक्ष मारक ठरली आहेत.
-------------------------
योजना फक्त कागदावरच ः रोजगार हमी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार अशा योजनांची जाहिरात मोठ्या प्रमाणावर होते, पण तलासरीसारख्या सीमाभागात त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. अपुऱ्या पायाभूत सुविधा, शिक्षणाच्या अभावामुळे या योजना तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत.
-------------------------
शिक्षणाचा अभाव, रोजगारावर मर्यादा ः तालुक्यातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी समाजातील असून, शिक्षणाची पातळी समाधानकारक नाही. तरुण दहावी-बारावीनंतर शिक्षण सोडून कामासाठी बाहेर पडतात. महिला मजुरांचे प्रमाण वाढले आहे.
----------------------------
६० ते ७० वाहनांमधून वाहतूक
तलासरीतून दररोज पहाटे ६० ते ७० वाहनांमधून शेकडो मजुरांचा ताफा गुजरातच्या औद्योगिक भागाकडे निघतो. अच्छाड, आमगाव, सूत्रकार, झाई, वडवली, झरि कवाडे, कोचाई, बोरमाळ , कुर्झे, उधवा ही स्थलांतराची केंद्रस्थाने बनली आहेत. काही तरुण मासेमारीसाठी बोटीवर काम करतात.
-----------------------
तलासरी तालुका ः अंदाजे लोकसंख्या दोन लाख
मजुरीवर अवलंबून लोकसंख्या - ७०%
स्थलांतर करणारे तरुण - १०,००० पेक्षा अधिक
प्रमुख वयोगट १८ ते ३५ वर्षे
मजुरी दर (गुजरात) ४५० - ७०० प्रति दिवस
मजुरी दर (महाराष्ट्र) ३०० - ४०० प्रति दिवस
कामाचे तास (गुजरात) १० - १२ तास
-----------------------------------
तलासरीतील स्थानिक उद्योग, प्रकल्प बंद झाल्याने हजारो तरुण बेरोजगार झाले. जर शासनाने सूक्ष्म उद्योग, प्रशिक्षण केंद्रे आणि स्थानिक गुंतवणूक आकर्षित केली, तर गुजरातकडे होणारे स्थलांतर थांबू शकते. तसेच तरुणवर्गाने स्वयंम रोजगाराकडे वळणे खूप गरजेचे आहे.
- संतोष भावर, उद्योजक
-----------------------------
शिकूनही आमचा काही फायदा नाही. कारण हल्ली सरकारी नोकऱ्या राहिल्याच नाहीत. सर्वत्र खासगीकरण झाले आहे. त्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नाइलाजाने परराज्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
- योगेश भोये, सुशिक्षित बेरोजगार, कुर्झे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT