मुंबई

खांदाड ग्रामस्थांनी पकडली जिवंत मगर

CD

खांदाड ग्रामस्थांनी पकडली जिवंत मगर
वन विभागाच्या उपकरणांवर प्रश्नचिन्ह
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) : खांदाड गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मगरदर्शनाच्या घटनांमुळे ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील तरुणांनी मोठ्या धाडसाने एक मगर जिवंत पकडून दिलासा दिला. मागील काळात ग्रामस्थांनी वन विभागाचे थेट लक्ष वेधून घेतले होते. तसेच माणगाव नगर पंचायतचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनीही ठोस कारवाईची मागणी केली होती. तरीही फक्त हिरव्या जाळीची फेन्सिंग आणि ‘सावधान, मगरींची प्राबल्य’ अशा फलकापलीकडे उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे मगरींची संख्या वाढली होती, त्यातच कोंबड्या, कोंबडे, पिल्ले व लहान पाळीव प्राण्यांवरही हल्ले सुरूच होते.
भीमसेन वले यांच्या घरासमोर मगरीचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच गावातील अनेक तरुण घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर महेश पोवार आणि सहकाऱ्यांनी कोणतीही इजा न करता मगरीला झडप घालून पकडले. युवक निखिल वले यांनी त्यानंतर तालुका वन अधिकारी प्रशांत शिंदे यांना कळविण्यात आले.
गावकऱ्यांची मागणी आहे की पकडलेल्या मगरीला दूरवर समुद्रवाहिनीच्या परिसरात सुरक्षित सोडण्यात यावे, अन्यथा ती पुन्हा गावात प्रवेश करू शकते. ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मगर पकडली, पण वन विभागाकडून अजूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाहीत. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी त्वरित पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
---------------------------
वन विभागाकडे उपकरणांचा अभाव
मगरीला पकडल्यानंतर वनपथक घटनास्थळी पोहोचले, मात्र आवश्यक पकड उपकरणांचा अभाव असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाच्या ताब्यात दिली व नंतर पिंजरा आणून तिला वाहनात सुरक्षितरीत्या हलविण्यात आले.
-------------------------------


MUM25F15514

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malad Student Abduction Case: मालाड लिंग शस्त्रक्रिया प्रकरणात चार आरोपींना अटक, रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये नेमकं काय?

Mumbai: मुंबईत खळबळ! घरावर ईडीची धाड पडलीये अन्...; प्रेयसीला खोटं सांगितलं, ९२ लाख रुपये उकळले, प्रसिद्ध रिलस्टार अटकेत

IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT