मुंबई

नगरपरिषद निवडणुकांना डिजिटल अडथळा

CD

नगर परिषद निवडणुकांना डिजिटल अडथळा
सुट्टीच्या दिवशी ‘ऑफलाइन’ नामनिर्देशन अर्ज स्वीकारणार
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन नामनिर्देशन प्रणालीत तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी, कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता. १६ ) रोजीही ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील १४६ नगर परिषद आणि २४ नगर पंचायतांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना अनेक राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आयोगाकडे तांत्रिक अडचणींची तक्रार केली होती.
आयोगाने या तक्रारींची गंभीर दखल घेत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेतला. यामध्ये सर्व्हरची गती कमी असणे, आवश्यक दस्तऐवज अपलोड करण्यात अडथळे येणे, ई-साईन संबंधित तांत्रिक समस्या निर्माण होणे, या तांत्रिक समस्या आढळल्या. यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी येत होत्या. पारदर्शक निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी, राज्य निवडणूक आयुक्त जगदीश मोरे यांनी तत्काळ हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

बदलापूरमध्ये इच्छुकांना दिलासा
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या संभ्रमात असलेल्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज भरण्याची मुदत सुरू होऊनही बदलापूरमध्ये अद्याप केवळ एका अपक्ष उमेदवाराचीच नोंद झाली आहे, तर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

महायुतीचा संभ्रम
भाजप-राष्ट्रवादीची स्थानिक स्तरावरील आघाडी निश्चित असली तरी, शिवसेनेसोबतच्या (शिंदे गट) जागावाटपाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे महायुती होणार की नाही, या गोंधळात इच्छुकांना ‘अर्ज कधी भरायचा?’ हा प्रश्न सतावत आहे.

महाविकास आघाडीत तणाव
महाविकास आघाडीत तब्बल आठ पक्षांची फळी उभी राहिली असली तरी जागावाटपावरून आणि अंतर्गत नाराजीमुळे तणाव वाढत आहे. विशेषतः, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ‘मनमानी’ कारभाराचा आरोप करत काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिलेल्या राजीनाम्याने आघाडीची एकजूट कमकुवत झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवार आणि रविवारची दिलेली मुभा, महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय दडपणातून इच्छुकांसाठी ‘सुटकेचा श्वास’ ठरली आहे.

वेळेत बदल
१५ व १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑफलाइन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malad Student Abduction Case: मालाड लिंग शस्त्रक्रिया प्रकरणात चार आरोपींना अटक, रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये नेमकं काय?

Mumbai: मुंबईत खळबळ! घरावर ईडीची धाड पडलीये अन्...; प्रेयसीला खोटं सांगितलं, ९२ लाख रुपये उकळले, प्रसिद्ध रिलस्टार अटकेत

IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT