मुंबई

पलावा जंक्शन उड्डाणपुलावर गर्डर उभारणी

CD

पलावा जंक्शन उड्डाणपुलावर गर्डर उभारणी
कल्याण-शिळ रोडवरील वाहतुकीत बदल
सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. १५ : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या काटई ते देसाई खाडी यादरम्यानच्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामाला आता वेग आला आहे. लोढा-पलावा जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या दोन उड्डाणपुलांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या पुलाचे गर्डर उभारणीचे काम सुरू करण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी, जड क्रेनच्या मदतीने १५ काँक्रीट गर्डर (कासारीओ कट येथे ३ आणि देसाई खाडीवर १२) बसवण्यात येणार आहेत. यामुळे वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये आणि काम सुरक्षितपणे पूर्ण व्हावे, यासाठी कल्याण-शिळ रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ अन्वये अधिसूचना जारी केली आहे. १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते सकाळी ५ या वेळेत वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. गर्डर उभारणीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळणे आणि पर्यायी मार्गांद्वारे वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याणकडून मुंब्रा-कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना लोढा पलावा जंक्शन, महालक्ष्मी हॉटेलसमोरील चौकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांसाठी कल्याण फाट्याकडून येणाऱ्या वाहीनीवर उजवीकडे वळून, सरस्वती टेक्सटाईलसमोरील गॅपपर्यंत विरुद्ध दिशेने जाऊन त्यानंतर डावीकडे वळण्याचा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. रात्रीच्या काळात येथील कामकाज आणि यंत्रसामग्रीमुळे मुख्य रस्त्यावरून वाहतूक देणे धोकेदायक ठरू शकते, म्हणून हा पर्याय वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कधी आणि कुठे आहेत निर्बंध?
कालावधी : शनिवार, १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत.
वेळ : दररोज रात्री ११ वाजून ५५ मिनिटे ते पहाटे ५ वाजेपर्यंत.

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
ठाणे शहर वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कल्याणकडून मुंब्रा-कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना लोढा पलावा जंक्शन, महालक्ष्मी हॉटेलसमोरील चौकात प्रवेशबंदी असेल.

पर्यायी मार्ग :
या वाहनांनी कल्याण फाट्याकडून येणाऱ्या वाहिनीवर उजवीकडे वळण घ्यावे.
सरस्वती टेक्सटाईलसमोरील गॅपपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करावा.
त्यानंतर डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
(रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर कामकाज आणि यंत्रसामग्री असल्याने हा तात्पुरता पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.)

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
पुलाच्या कामादरम्यान कंपनाचा धोका वाढू नये यासाठी जड व अवजड वाहनांना काटई चौक (बदलापूर चौक) येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग :
या वाहनांनी काटई चौकातून खाणा नाका मार्गे तळोजा एमआयडीसी रस्त्याचा वापर करून इच्छिस्थळी जावे.

वाहनचालकांना आवाहन
कामाच्या कालावधीत सर्व वाहनचालकांनी चिन्हांकित पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी. या पुलामुळे पुढील काळात कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठी सुसूत्रता निर्माण होऊन शहराच्या वाहतुकीला दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

लग्नानंतर पहिल्याच दिवशी राजवाडेंच्या घरी खळ्ळ खट्याक! समरही पेचात पडणार; 'वीण दोघातली...' मध्ये असं काय घडणार?

IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट

Navale Bridge Accident: नवले ब्रिजवर वाहनांच्या वेगावर येणार मर्यादा; 'इतका' वेग बंधनकारक, मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Latest Marathi Live News Update: दिल्ली बॉम्बस्फोट: पोलिसांनी नूहमधून दोन जणांना ताब्यात घेतले

SCROLL FOR NEXT