मुरबाड, ता. १५ (वार्ताहर) : तालुक्यातील पारतले-दहिवली येथे आठदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. हा सोहळा २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान होणार आहे. गुरुवर्य दत्तात्रय महाराज सरजिने व गुरुवर्य फुलनाथ महाराज (टाकेश्वर मठ) यांच्या आशीर्वादाने अखिल मुरबाड तालुका परमार्थी शेतकरी समाज यांच्या सहकार्याने सप्ताह होणार
सप्ताहाचे उद्घाटन श्री पांडुरंग पालखी सोहळा, दीपप्रज्वलन व कळशपूजन यांनी होणार असून, यासाठी योगी फुलनाथ महाराज गुरू रिद्धीनाथ महाराज (टाकेश्वर मठ) व योगी गोपीनाथ महाराज (संगमेश्वर मठ) उपस्थित राहणार आहेत. सप्ताहात कीर्तन, प्रवचन, पखवाज-जुगलबंदी, हरिपाठ, भजन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज दोन भाग्यवान श्रोत्यांना ‘ज्ञानेश्वरी प्रत’ व श्रीफळ; तसेच महिलांना मानाची पैठणी आणि पुरुषांना मानाचे वस्त्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दररोजचा कार्यक्रम पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते १२ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, दुपारी ३ ते ४ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन यानंतर जागर भजन होणार आहे.कार्यक्रम यू-ट्युबवरील ‘मराठी कीर्तन’ (श्री निखिल धोंडगे) या चॅनलवर थेट पाहता येणार आहे.
कीर्तनकारांची रूपरेषा
२५ नोव्हेंबर : ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर)
२६ नोव्हेंबर : ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर
२७ नोव्हेंबर : ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (बीड)
२८ नोव्हेंबर : ह.भ.प. संजय नाना धोंडगे (देवळा, नाशिक)
२९ नोव्हेंबर : ह.भ.प. नामदेव महाराज लबडे
३० नोव्हेंबर : ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा)
१ डिसेंबर : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव)
२ डिसेंबर : ह.भ.प. अर्जुन महाराज सरजिने (कल्याण) - काल्याचे कीर्तन व सांगता
सप्ताह म्हणजे भक्ती आणि परंपरेचा संगम. संतांच्या शिकवणी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तरुणांच्या श्रमदानामुळेच हा कार्यक्रम नावारूपाला आला आहे.
- मोहन गोपाळ मुरबाडे, सेवेकरी, दहिवली-पारतले सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. अनेक दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक उपासनेतून समाज एकत्र येतो व भक्तीचा आनंद लुटतो.
- गुरुनाथ शंकर दळवी, सेवेकरी, दहिवली-पारतले सप्ताह
१) गुरुनाथ दळवी
२) मोहन मुरबाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.