महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील
२१४ निवृत्त कामगारांना वाढीव सेवा उपदान
प्रसाद लाड यांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील एकूण २१४ निवृत्त कर्मचाऱ्यांना तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाढीव सेवा उपदानाचा लाभ मिळाला आहे. या लाभावर १० टक्के व्याजासह रक्कम वितरित करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
१२ नोव्हेंबरला आयोजित विशेष कार्यक्रमात १४ निवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या उपदानांतर्गत काही कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक लाभ झाला असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. २०१० पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावण्यासाठी महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियनच्या प्रमुख सल्लागार आमदार चित्रा वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून दिला.