मुंबई

अध्यात्म , संस्कृतीला पर्यावरणाची जोड

CD

निर्मळ नगरीत हरिनामाचा गजर
यात्रेनिमित्तचा दिंडी सोहळा आकर्षण, हजारो भाविक दाखल
वसई, ता. १५ (बातमीदार)ः पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांच्या गजरात पर्यावरणाची साद वसईच्या निर्मळनगरीतील यात्रेला सुरुवात झाली. यानिमित्त काढलेल्या दिंडी सोहळ्यात हरिनामाच्या गजराने अभूतपूर्व असा उत्साह निर्मळनगरीत संचारला होता.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र निर्मळ, श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य, श्रीमहाविष्णू, श्रीविमलेश्वर महादेव, श्रीमारुती, श्री दुर्गादवी व श्रीगणपती मंदिर विश्वस्त मंडळ, शंकराचार्य मंदिर वसईत आहे. या ठिकाणी शनिवारपासून येथील यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ५ वाजता माजी महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर वाघोली जुनी जिल्हा परिषद शाळा ते मंदिरमार्गे वि‌द्यार्थी, परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यात आली. या वेळी हरी नामाचा जयघोष, हर हर महादेवच्या गजराने वातावरण उत्साह संचारला. निर्मळ येथील लेझीम पथकाने केलेले सादरीकरण तसेस वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
-----------------------------------
निर्मळ यात्रा १५ दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे वसईची सुप्रसिद्ध सुकेळी, शिंगाडे, खजूर, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने तसेच आकाशपाळणे, खेळणी तसेच विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत. सकाळपासून शंकराचार्य समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात रीघ लागली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून कोंडी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपायोजना करण्यात येत आहेत.
-------------
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पर्यावरण वाचवा, प्राण वाचवा, पाणी रक्षण, धरती रक्षण, वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. वृक्षाचे संवर्धन, जतन करा यासह अनेक सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
------------
अवतरली पंढरी
विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर माउली, मुक्ताई, संत तसेच वारकरी वेशभूषेतील लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला होता. त्यामुळे अवघी पंढरी निर्मळ येथे अवतरसारखे वाटत होते. हजारो विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे दर्शन घडवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT