आयरामांमुळे कसरत
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : नवी मुंबई पालिका निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. केंद्र, राज्यातील सत्तेमुळे भाजप, शिंदे गटात पक्षप्रवेशाकडे अनेकांचा कल आहे, पण आयरामांना सामावून घेताना पक्षातील माजी नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते नाराज होणार असल्याने बंडखोरीची शक्यता आहे.
निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजप आणि शिवसेनेत इतर पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी प्रवेश केला आहे. शिवसेनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला आहे. सगळ्यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे, परंतु स्थानिक नगरसेवकांना प्राधान्य देणार असल्याने बाहेरून आलेल्यांचा हिरमोड होणार आहे. वाशीमध्ये माजी नगरसेवक संपत शेवाळे, माजी उपमहापौर अनील कौशिक यांच्यात स्पर्धा होणार आहे. सीवूड्समध्ये दत्ता घंगाळे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, विशाल डोळस यांच्यात स्पर्धा आहे. ऐरोलीमध्ये अशीच परिस्थिती असल्याने भाजपला उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
——————————————
नवी मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी झाल्यांनतर इच्छुक उमेदवारांनी कोणत्या प्रभागांमधून निवडणूक लढवायची, यासाठी मोर्चेबांधणीदेखील सुरू केली आहे, पण नवी मुंबईमध्ये युती होणार का नाही, याबद्दल संभ्रमावस्था आहे. राज्यात जरी महायुती एकत्र असले तरी लोकसभा निवडणुकीत फक्त नावासाठी महायुतीचे उमदेवार एकत्र लढत होते, तर विधानसभेत तर महायुतीमध्येच बंडखोरी झाली होती. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत काय होणार, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
-----------------------------------
आरक्षण सोडतीनंतर कोलांटी उड्या
- पॅनेल पद्धतीमुळे सीमांकन नसल्याने प्रत्येक प्रभागात एकच सर्वसाधरण उमेदवार उभा राहू शकतो. त्यामुळे सर्वसाधरण पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहेत. तसेच आरक्षित प्रभागांमध्ये साडेपाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार तयारी करत आहे.
- नवी मुंबईत नाईक, शिंदे यांची युती झाली नाही, तर थेट सामाना भाजप विरुद्ध शिवेसना शिंदे गट यांच्यामध्ये रंगणार आहे. जर महायुती झाल्यास शिंदे सेनेतील व भाजपच्या नाईक यांच्या गटातील अनेक नाराज उमेदवार महाविकास आघाडीच्या चिन्हांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आरक्षण सोडतीनंतर कोणत्या पक्षांचा झेंडा हाती घेतात येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
ः-------------------------------------------
भाजपमध्ये सर्व निर्णय वरिष्ठांकडून होतात. इच्छुक आणि स्थानिक नगरसेवक यांची चाचपणी केली आहे. स्थानिक नगरसेवकांना प्राधान्य राहणार आहे. वाशी, ऐरोलीसारख्या इतर काही ठिकाणी तडजोड करावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.
ः- डॉ. राजेश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.