मुंबई

‘रीलस्टार’ला विष्णुनगर पोलिसांनी केली अटक

CD

ईडीचा छापा पडल्याची थाप मारून तरुणीला लाखोंचा गंडा
‘रीलस्टार’ला अटक; सोने, कार, चार महागडे मोबाईल जप्त

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १५ ः घरावर ईडीचा छापा पडल्याचा बनाव करीत एका तरुणीची ९२ लाख ७५ हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रीलस्टारला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहेे. शैलेश प्रकाश रामगुडे (वय ३०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. यातून अनेक तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. त्याने आतापर्यंत चार ते पाच तरुणींना अशाच पद्धतीने फसवल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले. दरम्यान, अटकेनंतर पोलिसांनी शैलेशकडून ३९ तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार, चार महागडे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. फसवणुकीतून गोळा केलेले सोने त्याने ठाण्यातील विविध ज्वेलर्सकडे विकले होते. तेही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

प्रेमाचे नाटक आणि ईडीचा छापा
पीडित तरुणी डोंबिवली पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहते. तिची आणि ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणाऱ्या शैलेशची २०२४मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ‘मॉडेलिंग क्षेत्रात काम करतो’, ‘खूप श्रीमंत आहे’, ‘स्वतःची कार आहे’ अशा गोष्टी सांगत त्याने श्रीमंतीचा आभास निर्माण केला. हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली आणि शैलेशने तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या.
दरम्यान, सप्टेंबर २०२४मध्ये शैलेशने पीडितेला फोन करून ईडीने माझ्या घरावर छापा टाकला आहे. दोन किलो सोने आणि एक कोटी रुपये जप्त केले आहेत, अशी थाप मारली. त्यातून सुटका करण्यासाठी त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून त्याने तिच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ९२ लाख ७५ हजारांचा ऐवज उकळला.
----
लग्न नाही, पैसे नाही; अखेर उघड झाली फसवणूक
सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या काळात सुरू असलेल्या या व्यवहारांनंतरही शैलेशने लग्नाचा शब्द पाळला नाही आणि घेतलेले पैसे व दागिनेही परत केले नाहीत. संशय निर्माण झाल्यावर तरुणीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ५ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला.
त्यानंतर तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी शैलेशला अटक केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शैलेशने आधीही तीन तरुणींना अशाच प्रकारे फसवले होते. एका तरुणीकडून ४३ लाख, तर दुसऱ्या प्रकरणात २९ लाखांची फसवणूक केली असल्याचेही उघड झाले.

श्रीमंतीचा आभास आणि प्रेमाचा सापळा
स्वतःचे आकर्षक फोटो, महागडी कार, ब्रँडेड कपडे, मॉडेलिंगमधील काम अशा गोष्टींचा वापर करून शैलेश सोशल मीडियावर ‘परिपूर्ण जोडीदार’ प्रतिमा निर्माण करायचा. त्यामुळे तरुणी सहज त्याच्या जाळ्यात अडकत असत. एकदा जवळीक वाढली, की विविध बहाण्यांनी तो पैसा, सोने, महागड्या गिफ्ट्स उकळून घेत असे. उद्देश साध्य झाल्यावर मात्र तो अचानक गायब होत असे.
--
एक मिलियन फॉलोअर्स असलेला ‘रीलस्टार’
शैलेशचे इन्स्टाग्रामवर तब्बल एक मिलियन फॉलोअर्स असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रभावी रील्स आणि लाइफस्टाइल कंटेंटमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनेक जण सहज फसत होते. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT