अंबरनाथमध्ये जुगार छापा,
पाच जणांवर गुन्हा दाखल
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) ः अंबरनाथ पश्चिम रेल्वे परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगार खेळणारे निशाद पालकंडी (वय ४२), एकनाथ शिरस्सीकर (वय ४५), बशीर शेख (वय ४०), दिपचंद निशाद (वय ३५)आणि संतोष जाधव (वय ३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मटका जुगाराचे साहित्य, तसेच रोकड जप्त करण्यात आली आहे.