ग्राहकांची अडीच कोटींची थकबाकी
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) : मुलुंड महावितरणच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५मध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीज देयकांपोटी ५६.३७ कोटी रुपये इतकी मागणी नोंदवण्यात आली होती. यापैकी ५३.७५ कोटी रुपये वसूल झाले असून, उर्वरित २.६२ कोटी रक्कम अजून थकीत आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे, की त्यांनी कृपया अंतिम मुदतीपूर्वी आपले वीज देयक भरावे अन्यथा नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मुलुंड विभागात एकूण थकबाकी रक्कम २.६२ कोटींवर पोहोचली आहे. ही रक्कम मागील आणि चालू देयकांच्या थकबाकीचा समावेश करून आहे. वेळेत वीजदेयके न भरल्यामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. यामुळे महावितरणला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.