महिलांचे आरोग्य धोक्याच्या वळणावर!
अॅनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या प्रमाणात वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील महिलांचे आरोग्य गंभीर धोक्यात असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत केलेल्या तपासणीतून ॲनिमिया (रक्ताक्षय), उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) आणि मधुमेह (डायबिटीज) यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचे प्रमाण भयावह पातळीवर पोहोचले आहे. ॲनिमियाची सर्वाधिक प्रकरणे चंद्रपूर, पुणे, नागपूर, बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणी आणि नंदुरबार जिल्ह्यांत आढळली आहेत.
तिन्ही आजारांमध्ये महिलांची वाढती संख्या भविष्यातील मातृ आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य आणि समाजाच्या उत्पादक क्षमतेवर गंभीर परिणाम करू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. तज्ज्ञांनुसार अनियमित आहार, कमी शारीरिक श्रम आणि लठ्ठपणा ही या वाढत्या आजारांची प्रमुख कारणे आहेत. राज्यातील महिलांचे आरोग्य ‘धोक्याच्या वळणावर’ असल्याचा स्पष्ट इशारा मिळाल्यानंतर, सरकारने व समाजाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या आरोग्याला तातडीने प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रमुख आकडेवारी :
आरोग्य समस्या तपासणी केलेल्या महिला निदान झालेल्या महिला टक्केवारी (अंदाजे)
ॲनिमिया (रक्ताक्षय) ५५.८३ लाख ६,७१,२९१ १२%
| उच्च रक्तदाब १.४३ कोटी १०,७२,९०६ ७.५%
| मधुमेह १.३३ कोटी ५,२८,०४८ ४%
समस्या व उपाय :
समस्या मुख्य लक्षणे प्रतिबंध आणि उपाय
ॲनिमिया | सतत थकवा, चक्कर, फिकट चेहरा | आयर्न-फॉलिक ॲसिडयुक्त आहार (पालेभाज्या, डाळी, अंडी), डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स
उच्च रक्तदाब | डोकेदुखी, चक्कर, छातीत जडपणा | मीठ कमी, नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण कमी करणे, नियमित तपासणी |
| कॅन्सर | शरीरात गाठ, असामान्य रक्तस्राव, वजन कमी | नियमित स्क्रिनिंग (मॅमोग्राफी, पॅप स्मिअर), आरोग्यदायी आहार, धूम्रपान-मद्यपान टाळणे. |
......................................
काही समाजात महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिला त्यांच्या मासिक पाळीच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. महिला स्वतःच्या आरोग्याबाबत सजग नाहीत. त्यातून आरोग्य ढासळते. वारंवार गर्भधारणा झालेल्या महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. तुषार पालवे, स्त्रीरोगतज्ज्ञ, अधीक्षक, कामा रुग्णालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.