जे. जे. रुग्णालयात आयसीयू खाटा वाढणार!
क्षमता १०० पर्यंत वाढणार, प्रत्यक्षात गरज २५o खाटांची
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढली असून, लवकरच त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. सद्य:स्थितीत एसआयसीयूच्या ३४ खाटा रुग्णालयात आहेत; मात्र नव्याने बांधलेल्या आयसीयू, एमआयसीयू, पेडियाट्रिक्स खाटा एकत्र केल्या आहेत.
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार, रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १५ टक्के खाटा आयसीयूसाठी असणे बंधनकारक असते. त्यानुसार जे. जे. रुग्णालयाची क्षमता एक हजार ३५२ असून, त्यापैकी जवळपास २५० खाटा आयसीयूसाठी असायला हव्यात; मात्र जागेअभावी तितक्या खाटा उपलब्ध करणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, नव्याने तयार झालेल्या आयसीयूतील १० खाटा पेडियाट्रिक विभागासाठी असतील, असे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. लवकरच आयसीयू, न्यूरोसर्जरी ओटी, सीएसएसडी, सीसीयूच्या खाटांचे आणि नवीन ऑडोटोरियमचे उद्घाटन केले जाणार आहे.
....
आणखी ६० खाटांचा विस्तार?
जे. जे. परिसरातील आरोग्यसेवा संचालनालयाअंतर्गत असलेल्या महानगर रक्तपेढीची जागा जे. जे. रुग्णालयाला मिळाल्यास त्या ठिकाणी भविष्यात ६० खाटांचे आयसीयू तयार होण्याची शक्यता आहे. अनेकदा गंभीर रुग्णांना आयसीयू खाटा उपलब्ध होत नाही. केईएम, नायर, सायन आणि अनेक मोठ्या रुग्णालयांतील आयसीयू खाटा कायमस्वरूपी भरलेल्या असतात; पण ही जागा मिळाल्यास पुढील सहा महिन्यांत या खाटा उपलब्ध होऊ शकतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
...
आयसीयू खाटांची वाढती गरज लक्षात घेता, लवकरच त्याचा विस्तार केला जाणार आहे. यापूर्वी रुग्णालयात केवळ १५ खाटा होत्या. आता १०० झाल्या आहेत. पुढच्या काही आठवड्यांत त्याचे उद्घाटन होईल.
- डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.