मुंबई

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये ''सायन्स फिएस्टा २०२५'' उत्साहात

CD

मॉडेल इंग्लिश शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
कल्याण, ता. १६ (बातमीदार) : ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेचे वलय निर्माण करणारे मॉडेल इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन ‘सायन्स फिएस्टा २०२५’ हा दोनदिवसीय उपक्रम नुकताच शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या शाळेने यंदा विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. विज्ञान शिक्षक कपिल गोम्स यांनी कार्यक्रमाची माहितीपूर्ण प्रस्तावना सादर करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहलाचे संवर्धन करण्याचे महत्त्व सांगितले.
पहिल्या दिवशी दुपारी प्रदर्शन पालकांसाठी खुले करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचा उत्साहाने आस्वाद घेतला. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित किल्ले प्रतापगड या कला-एकात्मिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले. युनेस्कोने दिलेल्या मान्यतेने प्रेरित या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी इतिहास आणि स्थापत्यकलेचे सुंदर मिश्रण सादर केले. शाळेने प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी डॉ. शैलेश बजाज आणि खान अ‍ॅरिझ या दोघांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी नावीन्य, अचूकता आणि सादरीकरण या निकषांवर विद्यार्थ्यांचे काम तपशीलवार पाहिले.
दुसऱ्या दिवशी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत प्रदर्शनाचा शैक्षणिक आणि सहयोगी अनुभव घेतला. प्रत्येक विभागातील नावीन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रयोगांनी पाहुण्यांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांचा जोश, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळे हा उपक्रम शालेय दिनदर्शिकेतील एक संस्मरणीय अध्याय ठरला असल्याच्या भावना समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी व्यक्त केल्या. आयोजित उपक्रमात सचिव आनंदन नायर, प्राचार्या डॉ. शिरीन गोन्सालवेझ, वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शैलेश बजाज आणि भौतिकशास्त्र व एनईईटी विभागप्रमुख खान अ‍ॅरिझ यांनी प्रेरणादायी भाषणे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करणे, निर्भयपणे संशोधनाची दिशा धरणे आणि विज्ञानाची आवड टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नागरिक दाखल

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

Ajit Pawar Death : अजून विश्वास बसत नाही, सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील श्रद्धांजलीच्या फोटोसह ठेवलं स्टेटस

Baramati Plane Crash : 'ट्रॅक्टरला दोरी बांधून विमानाचे अवशेष बाजूला केले अन् उर्वरित तीन मृतदेह बाहेर काढले'; प्रत्यक्षदर्शीने सांगितली संकटाची कहाणी

Latest Marathi News Live Update : पुण्याहून कर्नाटकात जाणारा ८३ किलो गांजा पकडला

SCROLL FOR NEXT