‘टाटा’ उभारणार २,८०० मेगावॉटचे उदंचन वीज प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : टाटा पाॅवरकडून २,८०० मेगावाॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारसोबत करार करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील भिवपुरी आणि पुणे जिल्ह्यातील शिरवटा येथे हे प्रकल्प उभारले जाणार असून, त्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. येथे तयार होणारी वीज मुंबईसह राज्याला गरजेनुसार उपलब्ध होणार आहे.
मुंबईसह राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच औष्णिक वीज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून पर्यावरणपूरक हरित ऊर्जानिर्मितीला चालना दिली जात आहे. त्यानुसार टाटा पाॅवर पुण्यातील शिरवटा येथे १,८०० मेगावाॅट, तर रायगडमधील भिवपुरी येथे १,००० मेगावाॅटचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे राज्याची हरित ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढणार असून, विद्युत ग्रीडला स्थिरता मिळू शकणार आहे.
उदंचन प्रकल्प म्हणजे काय
उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी एक उंचावर तर दुसरे खालील बाजूला असे दोन तलाव आवश्यक असतात. त्यानुसार विजेची मागणी जास्त असताना उंचावरील तलावातील पाण्यावर वीजनिर्मिती करून ते खालील बाजूला असलेल्या तलावात साठवले जाते, तर विजेची मागणी कमी असताना रात्रीच्या वेळी तेच पाणी पुन्हा पंपाच्या सहाय्याने उंचावरील तलावात सोडून पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. पाण्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.