मुंबई

गरिबीतून मुलीला शिकवायचे होते

CD

मुलीली शिकवायचे होते, पण...
मृत काजोलच्या आईच्या आक्रोशातून वेदनादायी भावना
नालासोपारा, ता. १६ ( बातमीदार) ः आमची परिस्थिती गरीब, दाह बाय दहाच्या खोलीत आमचा संसार, दिवसभर काम केल्यानंतर रात्रीची चूल पेटते. मुलीला शिकवून तिला मोठे करायचे होते. पण ज्या शाळेत तिच्या भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला. माझ्या पोटचा गोळा गेला हो, असा आक्रोश व्यक्त करीत मृत काजोलच्या आईने वेदनादायी भावना व्यक्त करीत विकृत शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून प्रशासनापुढे न्यायाची मागणी केली आहे.
वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेमध्ये १० मिनिटे उशिरा आल्याने शिक्षिकेने सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या काजोल गौड या मुलीला १०० उठाबशा काढायला लावल्या. यामुळे तिला जीवघेण्या वेदना झाल्या. तिची कंबर, पाय आणि माणक्यात त्रास झाला, नसांना त्रास झाल्याने रक्त गोठले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. शनिवारी तिच्या मृतदेहावर वसई, सातिवलीच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. काजोलच्या अंतिम संस्कारासाठी सातिवली कुवारपाडा परिसरातील शेकडो महिला, पुरुष, सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावून शिक्षिका आणि शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
सातिवलीच्या कुवारपाडा येथील बैठ्या चाळीत गौड कुटुंबीयाचे घर आहे. आई-वडील कामगार आहेत. परिस्थिती गरिबीची असल्याने पहिलीपासून परिसरातीलच श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत काजोलला टाकले होते. आई शीला गौड, वडील सिकंदर गौड, भाऊ परशुराम गौड आणि काजोल असा त्यांचा परिवार. भाऊ दहावीत त्याच शाळेत शिकत आहे.
हंबरडा फोडत शिक्षिकेच्या शिक्षेनंतर घडलेला घटनाक्रम काजोलच्या आईने सांगितला. शनिवारी (ता. ८) शिक्षिकेने १०० उठाबशा काढायला लावल्यानंतर मुलगी व्याकूळ होऊन घरी आली. तिला तो त्रास सहन झाला नाही. आम्ही प्राथमिक उपचार केले. रविवारी पुन्हा तिला औषध देऊन मी कामावर गेले. रात्री घरी आल्यावर मुलीचा त्रास थांबला नाही. सोमवारी मुलीला शाळेत नेऊन शिक्षकांना जाब विचारला, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला घरी हाकलले. मुलीची प्रकृत्ती खालावत होती. आम्ही सोमवारीच रात्री बाजूच्या आस्था रुग्णालयात दाखल केले. तिथे दोन दिवस उपचार घेतले, पण फरक पडला नाही. गुरुवारी नालासोपारा येथील विजय लक्ष्मी रुग्णालयात दाखल केले. उपचारात सुधारणा होण्याऐवजी प्रकृती बिघडत होती. रुग्णालयाचे बिल वाढत गेले, पैसे जवळ नव्हते म्हणून गळ्यातील मंगळसूत्र विकले आणि रुग्णालयाचे बिल दिले. शुक्रवारी रुग्णवाहिकेतून मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. पण दुर्दैवाने काजोलचा रात्री मृत्यू झाला. आमची परिस्थिती चांगली नसल्याने आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी आर्थिक मदत केली. शाळा प्रशासनाने मात्र मदत करण्याऐवजी मुजोरीच दाखविली. माझ्या मुलीला न्याय पाहिजे, शाळेवर कारवाई झाली पाहिजे, अशा मागण्याही काजोलच्या आईने केल्या.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रुपेश ससाणे, शिवसेना उबाटा गटाचे तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे आणि स्थानिक महिला या सर्वांनीच पुढाकार घेतला. गौड कुटुंबीयांना साथ देऊन जोपर्यंत शिक्षिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा रूपेश ससाणे यांनी दिला.
---
आजारामुळे मृत्यू
मुलगी नेहमी आजारी असायची. आम्ही याबाबत तिच्या आईवडिलांना सांगितलेसुद्धा होते. शाळेत १०० नाही तर फक्त १० उठाबशा काढायला सांगितल्या होत्या. त्यात ही एकटी मुलगी नव्हती, तर इतर ४० ते ५० उशिरा आलेले विद्यार्थी होते. आठ दिवसांनंतर मुलीचा मृत्यू झाला आहे. तो उठाबशांमुळे नाही तर आजारामुळे झाला, असे बेजबाबदार उत्तर संस्थेचे खजिनदार रामआश्रय यादव यांनी दिले आहे.
--
योग्य ती कारवाई करू
या सर्व प्रकरणात फक्त वालीव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून कोणतीच पावले उचलली नाहीत. उद्या सोमवारी शाळा सुरू झाल्यावर आम्ही तपास करून योग्य ती कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT