मुंबई

डहाणूत शरद पवार गटाला खिंडार

CD

डहाणू, ता. १७ (बातमीदार) : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. त्या पक्षातील आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांच्या कार्यावर प्रभावित होऊन रविवारी (ता. १६) भाजपमध्ये प्रवेश केला.

डहाणूतील रामवाडी येथे भाजपमार्फत पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भरतसिंग राजपूत, खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, बापजी काटोळे, सुशील अवसरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जगदीश राजपूत, पंकज कोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. डहाणूत वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काशिनाथ चौधरी यांना मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन स्वागत केले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गवळी यांनी माजी सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप चाफेकर, माजी नगरसेवक शैलेश मुथा, तसेच तालुकाध्यक्ष संजू वरठा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Kolhapur Municipal Corporation: विरोधी पक्षनेता निवडीदरम्यान काँग्रेसचे अनिल रावळ यांना हार्ट अटॅक; कोल्हापूर महानगरपालिकेत दुर्दैवी घटना

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT