मुंबई

उल्हासनगरच्या राजकारणात ''भूकंप''

CD

उल्हासनगरच्या राजकारणात ‘भूकंप’
निर्मळे दाम्पत्य आणि किशनानी कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या राजकीय पटलावर रविवारी (ता. १६) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. माजी महापौर विद्या निर्मळे आणि त्यांचे पती विजय निर्मळे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा हाती घेतला आहे. याचबरोबर, शहरातील नामांकित उद्योगपती गोधू किशनानी आणि प्रवीण किशनानी यांच्या प्रवेशानेही भाजपला मोठी ताकद मिळाली आहे.

शहरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर विद्या निर्मळे आणि विजय निर्मळे यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश जिल्हाध्यक्ष कार्यालयात विशेष कार्यक्रमात पार पडला.
शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोधू किशनानी आणि प्रवीण किशनानी यांनीही त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेश सोहळा त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष हजेरी लावली. त्यांनी या प्रवेशांचे स्वागत करत, भाजप उल्हासनगर संघटनेसाठी हा ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अनुभवी आणि प्रभावशाली चेहरे भाजपमध्ये दाखल झाल्याने आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रवीण किशनानी यांची नियुक्ती
प्रवेश सोहळ्यानंतर भाजपने तत्काळ मोठा निर्णय घेत प्रवीण किशनानी यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांची ‘भाजप उपजिल्हाध्यक्ष’ म्हणून नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निर्मळे दाम्पत्याचा राजकीय अनुभव आणि किशनानी कुटुंबाचे सामाजिक व व्यापारी वर्तुळातील मजबूत नेटवर्क यामुळे उल्हासनगरमधील भाजपला नवीन गती, बळ आणि विस्तृत जनाधार प्राप्त होणार आहे.

ठाकरे गटाला धक्का
राजकीय जाणकारांच्या मते, हा प्रवेश उबाठा गटासाठी मोठा धक्का ठरला असून, आगामी निवडणुकीत नवे समीकरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Pune Tax Hike: निवडणूक झाली, आता पुणेकरांचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार! 'एवढ्या' करवाढीचा प्रस्ताव; 10 वर्षांपासून झाली नाही वाढ

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दुरुस्तीच्या कामामुळे 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गौरव

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

SCROLL FOR NEXT