मुंबई

पान ३ पट्टा

CD

आमदार निधीतून विरंगुळा केंद्र
तुर्भे (बातमीदार) : बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांचा विकासकामांचा धडाका सुरू आहे. याच अनुषंगाने रविवारी (ता. १६) नेरूळ सेक्टर ४ येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात आमदार निधीमधून तब्बल रु. ४५ लाख खर्च करून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सोलर हायमास्ट या कामांचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, महामंत्री दत्ता घंगाळे, विजय घाटे, नेरूळ पच्छिम मंडळ अध्यक्ष भास्कर यमगर, नेरूळ पूर्व मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक, सीवूड्स मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव उपस्थित होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ःः-----------------------------------------
विज्ञान प्रश्नमंजुषात विद्यार्थ्यांचा सहभाग
नेरूळ (बातमीदार)ः वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी लागावी, या दृष्टिकोनातून नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे पालिका संचालित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘प्रश्नमंजुषा’ हा स्पर्धात्मक उपक्रम अत्यंत उत्साहात झाला. या उपक्रमामध्ये प्राथमिक विभागात इयत्ता सहावी, सातवी व आठवी इयत्तेमधील प्रत्येकी एक अशा तीन विद्यार्थ्यांचा प्रत्येक शाळेचा एक समूह संघ स्वरूपात तयार करण्यात आला. यामध्ये २८ प्राथमिक शाळांच्या तीन विद्यार्थीय संघांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होत विज्ञानविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचप्रमाणे इयत्ता नववी व दहावी अशा दोन इयत्तांमधील प्रत्येकी एक अशा दोन विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेचा एक समूह तयार करण्यात आला.
़़़़़ः------------------------------------------------
रस्ते डांबरीकरणाची रहिवाशांची मागणी
खारघर (बातमीदार)ः खारघर सेक्टर ३६ मधील सिडकोच्या व्हालीशिल्प तसेच स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करतात. परिसरात हार्मनी स्कूल तसेच उप प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्यामुळे रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर निखळलेल्या खडी नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक पायी जात असल्यामुळे किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी हा रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
़़़़़ः----------------------------
ठाकरे गटाकडून अनाथांना फळवाटप
खारघर (बातमीदार) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने खारघर सेक्टर १२ मधील गिरीजा वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात फळवाटप करण्यात आले. शहर समन्वयक रामचंद्र देवरे, उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, उपशहरप्रमुख प्रशांत जांभूळकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम करण्यात आला. या वेळी अनाथ आश्रमातील मुलांना फळवाटप करून मुलांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली गेली. या वेळी शिवसेना शहरप्रमुख गुरुनाथ म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा वारंग, आनंद व्हावळ, संजय कानडे, पांडुरंग घुले, ॲड. जयसिंग माने, सचिन गोरे, संतोष कट्टीमणी उपस्थित होते.
़ः-------------------------------------
पनवेल महापालिकेची शिक्षण परिषद
पनवेल (बातमीदार)ः पनवेल महापालिकेतर्फे लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी पनवेल मनपा शाळांमधील विविध उपक्रमांची माहिती दिली गेली. या परिषदेत पनवेल पालिका क्षेत्रातील शिक्षणविषयक नियोजन, तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी नर्सरी शिक्षणाची अंमलबजावणी, नव्याने समाविष्ट झालेल्या ५१ शाळांमुळे निर्माण झालेली आव्हाने, शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांचे नियोजन, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, वाचन-लेखन कौशल्य वाढवण्याच्या पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीची तयारी, इयत्ता एक ते पाच मूलभूत कौशल्य वृद्धीसाठी शासनाच्या साधनांचा वापर याचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT