मुंबई

निधीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले

CD

निधीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले
शहापूरमध्ये ८,६५८ जणांचे अनुदान अडकले; लाभार्थी हप्त्यांसाठी मेटाकुटीला
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १८ : शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना आणि जनमन आवास योजनेतील तब्बल ८,६५८ घरकुले अर्ध्यावरच रखडली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लाभार्थ्यांचा दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता सरकारकडे अडकून पडला आहे. गेल्या एक महिन्यापासून या हप्त्यांसाठी शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयात येरझाऱ्या घालणाऱ्या लाभार्थ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ९,७२८ घरकुले वर्षभरापूर्वी मंजूर झाली होती. प्रधानमंत्री आवास योजनेत चार हप्त्यांमध्ये १ लाख २० हजार रुपये मिळतात. जनमन आवास योजनेत तीन हप्त्यांमध्ये दोन लाख रुपये मिळतात. पहिला हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी सिमेंट, विटा आणि इतर साहित्याची उसनवारी (कर्ज) करून घरांच्या बांधकामाचा पाया रचला आणि भिंती उभ्या केल्या. दरम्यान, शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे तब्बल ८,९८४ लाभार्थ्यांचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता १० ऑक्टोबरपासून रखडला आहे.

कातकरी समाजाचे स्थलांतर
यात सर्वाधिक फटका कातकरी समाजातील लाभार्थ्यांना बसला आहे. एकीकडे घरकुलांचे बांधकाम अर्धवट राहिले, तर दुसरीकडे रोजगाराअभावी पोटाची भूक भागवण्याची समस्या त्यांना सतावू लागली. थंडीत आणि पावसात उघड्या छताखाली हप्त्यांची वाट बघून निराश झालेल्या अनेक कातकरी लाभार्थ्यांनी आपला कुटुंबकबिला सोबत घेऊन मोलमजुरीसाठी स्थलांतर केले आहे. त्यामुळे त्यांची अर्धवट राहिलेली घरे आता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरकुल योजनांच्या अनुदानातील पुढील देय हप्त्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांचे हप्ते थांबले आहेत. ते लवकरच मिळावेत म्हणून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या थंडीत कुडकुडत दिवस काढणाऱ्या लाभार्थ्यांनी तातडीने थकलेले हप्ते देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांची घरे लवकर पूर्ण होऊ शकतील आणि उसनवारीची परतफेड करता येईल.
- बी. एच. राठोड, गटविकास अधिकारी, शहापूर पंचायत समिती

घरकुलाचे बांधकाम अर्धे झाले आहे; परंतु हप्ते मिळत नसल्याने पुढचे बांधकाम करता आलेले नाही. हप्ते मिळावेत म्हणून ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या कार्यालयात खेटे घालून आम्ही त्रस्त झालो आहोत.
- निवृत्ती भोर, लाभार्थी, कातबाव

१) ११० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ९,७२८ घरकुले वर्षभरापूर्वी मंजूर
२) चार हप्त्यांमध्ये एक लाख २० हजार रुपये
3) जनमन आवास योजनेत तीन हप्त्यांमध्ये दोन लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT