एक्सेलसॉफ्ट टेकनॉलॉजीचा ५०० कोटींचा आयपीओ
मुंबई, ता. १३ : स्वयंपरीक्षण तसेच घरच्या घरी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीचा आयपीओ १९ ते २१ नोव्हेंबर यादरम्यान बाजारात येत आहे.
हा आयपीओ ५०० कोटी रुपयांचा असून, त्यासाठी ११४ ते १२० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्याच्या या शेअरच्या आयपीओसाठी किमान १२५ शेअरसाठी व त्यापुढे १२५ च्या पटीतच शेअरसाठी अर्ज करावा लागेल. या आयपीओमधील निम्मे शहर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. छोट्या गुंतवणूकदारांना ३५ टक्के तर बिगर संस्थात्मक मोठ्या गुंतवणूकदारांना १५ टक्के शेअर मिळतील.
कंपनीतर्फे स्वयंचाचणी करण्यासाठी सारस ई ॲसेसमेंट, तर घरच्या घरी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी इझी प्रॉक्टर ही साधने आणली आहेत. डिजिटल लर्निंगमध्ये कंपनीत तज्ज्ञ असून, यात आपल्या तपशिलाची गोपनीयता आणि सुरक्षितता तसेच आंतरराष्ट्रीय मानके पाळतानाच या साधनांचा वापर सहजपणे करता येईल, यावर कंपनीचा भर आहे. कुशल कर्मचारीवर्ग असलेल्या कंपनीतर्फे इटली, इजिप्त, फ्रान्स, ब्राझील, फिलिपिन्स या देशात आपला व्यवसाय विस्तारण्यावर भर दिला जाईल. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला २,४८८ कोटी रुपये महसूल मिळाला. दोन वर्षांपूर्वी हा आकडा १,९७९ कोटी रुपये होता, असे कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी धनंजय सुधन्वा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.