मुंबई

काँग्रेसला ‘स्‍वबळ’ आव्हान

CD

काँग्रेसला ‘स्‍वबळ’ आव्हान
निवडणुकीसाठी चेहरा नाही; भाजपला फायदा होण्याची शक्यता
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रसचे मुंबई महापालिकेतील मोहरे पक्ष सोडून गेले आहेत. आता काँग्रेसकडे मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीचा चेहरा नाही. पक्षसंघटनेत मतभेद तीव्र आहेत. त्यामुळे या परिस्थितीत स्वबळावर निवडणुका लढवणे आव्हात्मक आहे. या भूमिकेमुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसच्या मतांवर परिणाम होईलच; पण भाजपाला फायदा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसने २०१७च्या पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असता ३० नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. त्या निवडणुकीत परिस्थित वेगळी होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन पक्ष झाले आहेत. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये दोन गट होते. त्या वेळी निवडणूक जवळ आली तरी पक्षांमधील भांडणे सुरू होती. मात्र काँग्रेसच्या मुस्लीमबहुल भागातील तसेच काही प्रमाणात दलित मतदार कायम जोडलेला असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आल्याने पालिकेत त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले.

गळतीमुळे संघटना कमकुवत
मिलिंद देवरा, संजय निरुपम हे काँग्रेसचे मोठे चेहरे पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या गळतीमुळे संघटात्मक ताकत घटली आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर व रवि राजा हे विरोधी पक्षनेते होते. हे मुंबईमधील काँग्रेसचे चेहरे होते. आता तसा चेहरा काँग्रेसमध्ये राहिला नाही. तिघांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसला चेहरा उरलेला नाही.

महाविकास आघाडीत फूट
गेल्या साडेतीन वर्षांनंतर पालिका निवडणूक होत आहे. शिवाय शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत युत्या, आघाड्या वेगळ्या असणार आहेत. मतांची विभागणी होऊ नये, शिवाय मताचे गणित जुळवण्यासाठी शिवसेना (शिदे गट), भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका युतीत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रसेच्या ‘एकला चलो रे’मुळे आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.

वॉर्डस्तरावर शुकशुकाट
मनसे, शिवसेना (ठाकरे) एकत्र आले असताना काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. वॉर्डाचा अभ्यास, नियोजन, मतांचे गणित जुळवण्यात काँग्रेस नेहमीच मागे असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. शिवाय सध्या पक्षातच दोन गट असल्याचे लपून राहिलेले नाही. याचा फटका याआधीही काँग्रेसला बसला आहे. पक्षबांधणी, वॉर्डबांधणी, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणे याबाबतीत काँग्रेसमध्ये शुकशुकाट असल्याचेही दिसते.

काँग्रेसच्या भूमिकेमुळे आघाडीत आश्चर्य
मनसेला आघाडीत घेतल्याने बिहारच्या निवडणुकीत फटका बसेल, असे काँग्रेसला वाटले होते. मात्र बिहारमध्ये काँग्रेसची दाणादाण उडाली; तरीही मुंबईत मनसे सोबत नको आणि स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर तो काँग्रेसचा वैयक्‍तिक प्रश्न असल्याची भूमिका खुद्द उद्धव ठाकरे यांनी माडली आहे. भाजपाविरोधात असलेले सर्व पक्ष एकजूट होणे आता काळाची गरज होती, मात्र अशा परिस्थितीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे आघाडीत आश्चर्य व्यक्त होत आहे.

पक्षबांधणीत अपयश
विधानसभेतील दारुण पराभवानंतर मुंबई काँग्रेसच्या संघटनेत एक प्रकारची मरगळ आली आहे. पालिका निवडणुका काही दिवसांवर आल्या असल्या तरी प्रत्यक्षात निवडणुका लढवण्याची तयारी सुरू झालेली दिसत नाही. पहिले शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करीत होती. आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्‍यामुळे लढण्यास इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध इतर सर्व नेते हा सुप्त संघर्ष संपलेला नाही. अलीकडे दीड हजारांपेक्षा अधिक इच्छुकांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे पक्षाने सांगितले. दरम्यान, बिहारचे निकाल बघता यातील अनेक जण टिकतील का, हादेखील प्रश्न आहे.

मराठी मतदारांना मुकावे लागणार
काँग्रेसने स्‍वबळावर लढण्याचे ठरवल्‍याने फक्त मुस्लीम मतदार काँग्रेसला तारतील. मात्र शिवसेनेसोबत युती केल्याने मराठी मतांचा फायदा काँग्रेसला झाला असता तो होणार नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक व्यक्‍त करत आहेत.

स्वबळाच्या भूमिकेमागील कारणे
१. आघाडी केल्यामुळे मुस्लीम, दलित व्होटबँक ठाकरेंकडे सरकण्याची भीती
२. मनसेच्या मुस्लीमविरोधी भूमिकेचा संभाव्य फटका टाळण्याचा प्रयत्न
३. निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनिश्चितता
४. स्वबळावर लढल्यास नव्या चेहऱ्यांना संधी
५. शिवसेनेची मते काँग्रेसकडे वळत नाहीत

पक्षासमोरील अडचणी
- मुंबईत काँग्रेसला चेहरा नाही
- अनेक नेते पक्ष सोडून गेल्यामुळे संघटना कमकुवत
- पक्षसंघटनेतील अंतर्गत मतभेद कायम

पक्ष वाढवण्यासाठी १२ महिने काम कराव लागते. ताकद वाढवण्यासाठी स्वबळावर लढण्याचे कारण मुळात चुकीचे आहे. स्वबळाच्या भूमिकेमुळे काँग्रेस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे. सोबतच भाजपच्या यशासाठी अनुकूल वातावरण काँग्रेस निर्माण करीत आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक

२०१७ निवडणूक पक्षीय बलाबल
२०१७
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - ९
सपा - ६
मनसे - ७
एमआयएम - २
अखिल भारतीय सेना - १
अपक्ष - ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT