अकाली जन्मलेल्या योद्ध्यांचा गौरव
जागतिक मुदतपूर्व प्रसूती दिनानिमित्त वाडियात उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : बाळाचा जन्म हा ३७ आठवड्यांच्या आत झाला तर ती अकाली प्रसूती म्हणून ओळखली जाते. ही जागतिक आरोग्य समस्या असून, जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रीमॅच्युअर) दिनानिमित्त बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाने आज (ता. १८) अकाली जन्मलेल्या चिमुकल्या योद्ध्यांचा सन्मान केला. या उपक्रमात ५० हून अधिक प्रीमॅच्युअर बाळे आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
अकाली जन्मलेल्या बाळांना श्वसनासंबंधी त्रास, प्रतिकारशक्तीच्या समस्या, आहाराच्या सेवनात अडचणी येणे आणि विकासात विलंब होणे यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा अवस्थेतही यांनी जगण्यासाठी संघर्ष केला असून, याचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
...................................
वाडिया रुग्णालयात दरवर्षी पाच हजार नवजात शिशूंवर उपचार होतात. त्यापैकी जवळपास ५० टक्के शिशूंना अकाली जन्माशी संबंधित परिस्थितीमुळे रुग्णालयात दाखल केले जाते. जगभरात सरासरी १० पैकी एक बाळ अकाली जन्माला येते. नवजात शिशूंच्या आधुनिक उपचारांमुळे जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत अकाली मृत्यू टाळता येऊ शकतात. वेळोवेळी केली जाणारी जागरूकता, काळजी आणि आरोग्य सेवा प्रणालींची तातडीची गरज अधोरेखित करते, अशी प्रतिक्रिया नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. विनय जोशी यांनी व्यक्त केली.
.......................................
अकाली जन्मलेली बाळे ही खरी योद्धा असतात आणि त्यांना निरोगी होण्यासाठी विशेष काळजी, सतत लक्ष आणि प्रेमाची आवश्यकता असते. आमचे ध्येय हे केवळ प्रगत वैद्यकीय उपचार प्रदान करणे नसून, या लहान योद्ध्यांना निरोगी भविष्य उपलब्ध करून देणे आहे.
- डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.