मुंबई

पनेवलला न्हावा-शेवातून रसद

CD

पनवेलची पाणीटंचाईतून मुक्ती
न्हावा-शेवाची पुरवठा योजना मार्चमध्ये कार्यान्वित
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : पनवेल महापालिका, सिडकोचे नैना, जेएनपीटी पोर्ट आणि एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ ही योजना आखण्यात आली होती. या योजनेचे ७० ते ७२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज असल्याने पनवेलची पाणीटंचाईतून मुक्ती दृष्टिपथात आहे.
भूसंपादन, अतिक्रमण, शासकीय परवानग्या आणि इतर तांत्रिक कारणांमुळे न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ ही योजना पूर्णत्वास येण्यास सरकारला तब्बल पाच वर्षांहून अधिकचा काळ लागला. पाताळगंगा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून पाणी उपसा करून खालापूर तालुक्यातील वयाळ पंपिंग स्टेशनपासून तब्बल ३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून तळोज्यापर्यंत पाणी आणले जाणार आहे. जुनी जलवाहिनी बदलून नवीन वाहिनी टाकणे आणि काही ठिकाणी पूर्णपणे नवीन टाकण्याचे मोठे आव्हान एमजेपीसमोर होते. नव्या मुदतीनुसार मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
------------------------------
२२८ एमएलडी साठा
- हिवाळा संपताच पनवेलकरांना पाणीटंचाईची चाहूल लागते. या योजनेतून २२८ एमएलडी साठा उपलब्ध होणार आहे. तसेच सिडकोतर्फे पनवेल तालुक्याच्या दक्षिण भागात विकसित केल्या जाणाऱ्या नैना भागातील वस्त्यांना पाणी मिळणार आहे.
- पनवेल तालुक्यातील काही गावांची तहान भागणार आहे. जेएनपीटी पोर्ट आणि एमएमआरडीएतर्फे तळोजा, रोहिंजण आणि पळस्पे येथील गृहप्रकल्पांकरिता पाणी दिले जाणार आहे. पनवेल महापालिकेतील रहिवाशांना योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
-----------------------------------------
भोकरपाडा येथे जलकुंभ
वयाळ, कळंबोली, रोहिंजण अशा ३२ किलो मीटरच्या मार्गावर जलवाहिनी बसवण्यात येत आहे. सद्यःस्थितीत रोहिंजनपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम झाले आहे. जलवाहिनीवर काही भागातही जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू आहे. भोकरपाडा येथे १२ एमएलडी क्षमतेचे भूस्तरीय जलकुंभ उभारण्यात आला आहे. या भागात पाणी साठवून नंतर शहराकडे पाठवण्यात येणार आहे.
--------------------------------------------
योजनेचा फायदा
- पनवेल पालिका - १०० एमएलडी
- जेएनपीटी बंदर - ४० एमएलडी
- सिडको - ६९ एमएलडी
- एमएमआरडीए - २० एमएलडी
----------------------------------------------
योजनेतील अडथळे
- वयाळ ते रोहिंजनपर्यंत ४० किलो मीटरदरम्यान जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन करावे लागले.
- भूसंपादनदरम्यान शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दर.
- जलवाहिनीच्या मार्गावर असणारी अतिक्रमणे.
- रेल्वे, ओएनजीसी, एचपीसीएल, बीपीसीएल, महानगर गॅस सारख्या यंत्रणांकडून एनओसीतील दिरंगाई.
---------------------------------------------------
भाजप आमदारांचा पाठपुरावा
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ या योजनेकरिता पाठपुरावा केला आहे. पावसाळी अधिवेशनात योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावर मार्च २०२६ मध्ये योजनेचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. तसेच पूर्वीच्या खर्चामध्ये कंत्राटदार काम पूर्ण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT