मार्गशीष गुरुवारनिमित रेडिमेड देवींच्या घटाचा साज
महालक्ष्मी, कालिका माता, दुर्गा माँ देवीच्या मुखवट्यांनी वेधले भक्तांचे लक्ष
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : शुक्रवारपासून (ता. २१) मार्गशीष सुरू होणार असून, मार्गशीर्षचा पहिला गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या अनुषंगाने बाजारपेठेत खरेदीसाठी भक्तांनी एकच गर्दी केली आहे. बाजारपेठदेखील विविध देवीचे मुखवटे, दागिने, कन्या पूजनचे साहित्य, रेडिमेड देवी आदी वस्तूंनी बहरून गेली आहे.
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या पहिल्या मार्गशीष गुरुवारनिमित बाजारपेठ सज्ज झाली असून, नागरिकांनी तयारीसाठी तुडुंब गर्दी केली आहे. बाजारपेठेत देवीच्या घटस्थापनेसाठी विविध कृत्रिम फुलांच्या माळा, रंगीत साड्या, पूजेचे साहित्य, फॅब्रिक व रेडिमेड देवीचे मुखवटे, फोल्डिंग देवी, पारंपरिक दागिने, कन्या पूजन साहित्य, देवीचे मुखवटे, कवड्यांची माळ आदी वस्तूंनी ठाणेकर भक्तांचे मन मंत्रमुग्ध केले आहे.
मुखवटे १०० ते २००० पर्यंत उपलब्ध
या सर्व वस्तूंमध्ये नवरंगी घटाची साडी १०० ते ५००, देवीचे साधे मुखवटे १०० ते २००० पर्यंत असून, यामध्ये फायबर, ॲक्रेलिक, मेटल आणि पीओपी यापासून बनवलेले सुंदर आणि देखणे मुखवटे नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच हिरेजडीत मुखवटेदेखील या ठिकाणी उपलब्ध झाले असून, यामध्ये महालक्ष्मी, दुर्गामाता, कालिका माता, तुळजाभवानी, वैष्णव देवी अशा विविध देवींच्या मुखवट्यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पारंपरिक देवीच्या आभूषणांसाठी नागरिक गर्दी करत असल्याचे विक्रेते समीर विद्वांस यांनी सांगितले.
विविध दागिने बाजारपेठांमध्ये उपलब्ध
दागिन्यांमध्ये ठुशी ६० ते ५००, कोल्हापुरी साज ६० ते ५००, तन्मणी १०० पासून, अंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र १००, पुतळे हार २६०, लक्ष्मी हार ९०, राणीहार १५०, पोहे हार १५०, कैरी हार २६०, कंबरपट्टा १००, नथ ३०, बाजूबंद ६०, नथनीची बिंदी ६०, कवड्यांची माळ १०८ ते ३३०, कानातले ३० असे विविध आकर्षक दागिनेदेखील नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.
देवीच्या सजावटीसाठी कमळ आसन
घरगृती घटस्थापनेसाठी कमल आसन ४००, कापडी, पीओपी व फायबरमध्ये रेडिमेड देवी, मार्गशीषसाठी वरलक्ष्मी (१० ते १८ इंच) १२०० ते २२००, सुहासिनींसाठी वाण सेट आदी विविध रंगीबिरेगी व आकर्षक वस्तूंनी भाविकांचे मन वेढले असून, भक्तांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू केली असल्याचे श्रृंगार वस्तू भंडारचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.