मुंबई

कल्याण–डोंबिवलीत महायुतीतील घरगुती लढत चिघळली

CD

कल्याण-डोंबिवलीत महायुतीत चुरशीचा संघर्ष
शिंदे गटातील अनेक महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते भाजपत

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : महायुती एकत्र सत्तेत असली तरी स्थानिक पातळीवरील राजकारणात मात्र मैत्री कुठे संपते आणि स्पर्धा कुठे सुरू होते, हे स्पष्टपणे दिसू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष चुरशीचा होत आहे. मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत घडलेल्या नाट्यमय उलथापालथींनी हेच चित्र अधिक ठळक झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवारी भाजपने थेट कोंडी केली. डोंबिवलीचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन तासांत राजकीय समीकरणे बदलणारी पावले टाकली. खासदार श्रीकांत शिंदे यांचे अगदी निकटवर्ती असलेले तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, युवासेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जिवलग असलेले लोकही हातातून निसटत असल्याने शिंदे गटात चिंतेचे वातावरण आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते व पाच वेळा नगरसेवक राहिलेले वामन म्हात्रे यांचे वारसदार अनमोल म्हात्रे यांचा भाजप प्रवेश हा सर्वात महत्त्वाचा ठरला. अनमोल आणि पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला. वामन म्हात्रे यांचा कल्याण-डोंबिवलीत ठसा असलेला जनाधार लक्षात घेता, त्यांचा वारस भाजपात जाणे हा शिंदे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातो.
--
शिंदे गटाला दुसरा धक्का
तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे तसेच माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनीदेखील समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून शिंदे गटातील अंतर्गत गळती अधिक उघड केली. महेश पाटील यांची शिंदे गटाच्या संघटनेतील महत्त्वाची भूमिका आणि त्यांचे चव्हाण यांच्याशी असलेले निकटचे संबंध या प्रवेशाला अधिक वजनदार ठरवतात.
या संपूर्ण घडामोडींकडे पाहता चव्हाण यांनी आपल्या होमग्राउंडवर महापालिका निवडणुकीपूर्वी थेट ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचे जाणवते. महायुतीमधील मित्रपक्षावरच केलेली ही टार्गेटेड कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट अशीच चुरस राहणार असल्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT