मुंबई

आयआयटी मुंबईची क्यूएस रँकिंगमध्ये घसरण

CD

आयआयटी मुंबईची क्यूएस रँकिंगमध्ये घसरण

दिल्लीची आघाडी; पहिल्या शंभरमध्ये चारच विद्यापीठे

नवी दिल्ली, ता. १८ : जगभरातील विद्यापीठे, तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या गुणवत्तेसंदर्भातील क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटीची क्यूएस रँकिंग २०२६ची आवृत्ती मंगळवारी जाहीर झाली आहे. यात आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मागील वर्षांच्या तुलनेत मोठी घसरण झाली असून, दुसरीकडे देशात आयआयटी दिल्लीने देशात सर्वोत्कृष्ट श्रेणीत येण्याचा मान पटकावला आहे. त्यानंतर आयआयटी खरगपूर यांचा क्रमांक आहे.

आयआयटी मुंबई यंदा ४८व्या स्थानावर असून, क्यूएस रँकिंगमध्ये पहिल्या १०० मध्ये देशभरातील केवळ चार विद्यापीठांचा समावेश आहे. क्यूएस रँकिंगमध्ये भारतातील १०३ विद्यापीठांपैकी ३२ विद्यापीठांची यंदा स्थानात सुधारणा झाली आहे, तर १५ विद्यापीठांनी मागील क्रम कायम, तर ३० विद्यापीठांची घसरण झाली आहे. या वर्षीच्या रँकिंगमध्ये समाविष्ट असलेल्या १५ आयआयटींपैकी सहा आयआयटींनी २०२५च्या तुलनेत २०२६ मध्ये आपली रँकिंग सुधारली आहे. दुसरीकडे, क्युएस रँकिंगमध्ये देशातील ७३ टक्के विद्यापीठांची क्यूएस रँकिंगमध्ये काही प्रमाणात घसरण झाली असून, मुंबई विद्यापीठाने आपले २४५वे स्थान कायम ठेवले असून, मुंबईतील आयसीटीसह राज्यातील विद्यापीठांची मोठी घसरण झाली आहे.
‘भारतीय विद्यापीठे ज्ञानविनिमय आणि पर्यावरण संवर्धन यासंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. उच्च शिक्षणप्रणाली काही उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करत आहेत. आयआयटी आणि दिल्ली विद्यापीठासारख्या संस्थांत हवामान बदलाशी लढण्यासाठी उच्च शिक्षणाची भूमिका या रँकिंगमध्ये अधोरेखित केली आहे,’ असे क्यूएसच्या सीईओ जेसिका टर्नर यांनी म्हटले आहे.
--
या विद्यापीठांची प्रगती
क्यूएस रँकिंगच्या २०२६च्या आवृत्तीत अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोअर नाेंदवला आहे. ज्यात टॉप ७०० मध्ये नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी रुरकी, शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेस, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, राऊरकेला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), यूपीईएस यांसारख्या भारतीय विद्यापीठांनी टॉप ७०० मध्ये स्थान मिळवून सर्वाधिक स्कोअर नोंदवला आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT