मुंबई

धसई जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी चढाओढ?

CD

धसई जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी ‘चढाओढ’
एका जागेसाठी अनेक दावेदार, बंडखोरीचा धोका!
टोकावडे, ता. १९ (मुरबाड) : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी धसई गटात उमेदवारीसाठीची चुरस शिगेला पोहोचली आहे. धसई गट सर्वसाधारण आरक्षित झाल्यानंतर या एका जागेसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, जवळपास १५ ते १६ इच्छुक उमेदवार सक्रिय झाल्याने पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

‘‘मी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले. त्यामुळे तिकीट मलाच मिळाले पाहिजे,’’ अशी मागणी अनेक इच्छुक करत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा तिढा निर्माण झाला आहे. धसई गट सर्वसाधारण आरक्षित झाल्यानंतर या ठिकाणी स्थानिक उमेदवार असावा, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे, ज्यामुळे अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठे नेते आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळावे, यासाठी गटबांधणी आणि तडजोडींची राजकीय सूत्रे वापरत आहेत, तर काही जण प्रतिस्पर्धी इच्छुकांचे गणित बिघडवण्यासाठी गुप्त राजकीय संपर्काचा वापर करत असल्याची चर्चा आहे.

तिकीटवाटप हीच ‘अग्निपरीक्षा’
तिकीटवाटपानंतर पक्षातील नाराजीचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योग्य काम करूनही तिकीट न मिळालेले अनेक इच्छुक अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी दर्शवत आहेत. गाव-वाडी-पाड्याशी नाळ जोडलेले आणि विविध संस्थांमध्ये (ग्रामपंचायत, बाजार समित्या, सोसायट्या) सक्रिय असलेले इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिल्यास, ते पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे राजकीय गणित बिघडवू शकतात. त्यामुळे तिकीटवाटप हीच पक्षांसाठी मोठी ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे.

निवडणुकीचे बदलते स्वरूप
धसई गटातील जिल्हा परिषद निवडणूक केवळ पक्षनिष्ठेवर आधारित राहणार नसून, उमेदवाराचा व्यक्तिगत परिचय, स्थानिक नेतृत्व, मतदारांशी असलेला व्यक्तिगत संपर्क आणि विविध संस्थांमधील पकड, या घटकांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे. या सर्व कसोट्यांवर खरा उतरणारा उमेदवारच या गटात यशस्वी होईल, असे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Ajit Pawar Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजेश टोपेंनी दोन वाक्यात विषय संपवला, Video

February Tarot Horoscope: फेब्रुवारीत बदलणार भाग्य! लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 12 राशींमधील कोणत्या राशींना मिळणार श्रीमंती? वाचा मासिक टॅरो राशीभविष्य

Horoscope : शनिची साढेसाती अन् राहु प्रकोपातून 'या' राशींची होणार सुटका; 3 फेब्रुवारीनंतर धनलाभ, जुनी समस्या संपणार, पूर्ण होईल मोठं काम

Senior Travel Insurance : निवृत्तीनंतर निश्चिंत प्रवासासाठी प्रवास विमा का गरजेचा? तज्ज्ञ सांगतात महत्त्वाच्या गोष्टी

Indigo Flight Bomb Threat: कुवेत–दिल्ली इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; अहमदाबादमध्ये तातडीचे लँडिंग

SCROLL FOR NEXT