‘वन आहार महोत्सवा’चे आयोजन
आदिवासी बांधवांची समृद्ध संस्कृती जतन करण्यासाठी उपक्रम
मुंबई, ता. १९ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत ‘वन आहार महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पावरा समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार आहे. पोष फाउंडेशनच्या अमोघ सहजे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पंचमहाभूते फाउंडेशन, दादर सांस्कृतिक मंच या संस्थांचे या महोत्सवास सहकार्य आहे.
पोष फाउंडेशनचे अमोघ सहजे म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या आक्रमणाच्या काळात ही संस्कृती जपण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अमोघ यांनी हा वनआहार महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जो निधी उभा राहणार आहे, त्यातून आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे सहजे यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सांगितले की, ‘नंदुरबार जिल्ह्यातील पावरा आदिवासी बांधव सुदृढ असण्याचे कारण म्हणजे त्यांची खाद्यसंस्कृती होय. या बांधवांच्या संस्कृतीचे संवर्धन झाले नाही, तर त्यांची खाद्य, वाद्य, संगीत संस्कृती; त्यांची कला, भाषा लोप पावेल. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महापुरात आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान
पंचमहाभूते फाउंडेशनचे अमित सावंत यांनी सांगितले की, ‘यावर्षीच्या महापुरात नंदुरबारमधील पावरा आदिवासी बांधवांच्या शेतीचे आणि जगण्याचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबारच्या या बांधवांना मुंबईसारख्या शहरात थेट व्यासपीठ देणे, म्हणजे त्यांच्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे, कलेचे आणि अति-पौष्टिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणे होय. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या ‘वन-आहार महोत्सवाला’ प्रतिसाद द्यावा, हे आमचे कळकळीचे आवाहन आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.