मुंबई

एमपॉवरच्या पाच वर्षाच्या अहवालातून महिती उघड

CD

पुरुषांमध्ये वाढती मानसिक घुसमट
एमपॉवरच्या पाच वर्षांच्या अहवालातून महिती उघड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : देशभरातील तरुण आणि कार्यरत वयोगटातील पुरुषांमध्ये मानसिक आरोग्याच्या तक्रारी झपाट्याने वाढत आहेत. तणाव, नैराश्य, नातेसंबंधातील ताण आणि बर्नआऊट यांचा प्रभाव पुरुषांमध्ये सर्वाधिक जाणवत आहे. विशेष म्हणजे, मदत मागणाऱ्या ४० टक्के पुरुषांना तत्काळ मानसिक दिलासा मिळाल्याचेही दिसून आले असल्याचे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर संस्थेच्या पाच वर्षांच्या माहितीतून समोर आले.

‘पुरुष अजूनही प्रचंड भावनिक भार शांतपणे वाहत आहेत’ असे वास्तव एमपॉवर संस्थेच्या पाच वर्षांच्या एकत्रित माहितीतून समोर आले आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या या मानसिक आरोग्य उपक्रमाने हेल्पलाइन, समुपदेशन सेवा आणि युवा कार्यक्रमांतून पाच वर्षांत जवळपास २.८३ लाख पुरुषांपर्यंत पोहोचल्याचे जाहीर केले. यात, १८-२५ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असून, जवळपास २.०७ लाख तरुणांच्या विविध तपासणी आणि कॅम्पस मुलाखतीतून मांडण्यात आले.
..........................
अहवालानुसार
कामकाज करणाऱ्या २६-४० वयोगटातील पुरुषांनी एमपॉवरच्या ‘१ऑन१’ या हेल्पलाइनवर सर्वाधिक मदत मागितली. २०२२ ते २०२५ दरम्यान तब्बल ७५,७०२ पुरुषांनी फोन करून भावनिक ताण व्यक्त केला. लाज, संकोच किंवा ‘जजमेंट’ची भीती यामुळे अनेकांनी अनामिकरित्या संपर्क साधला असल्याचे संस्थेने सांगितले. या कॉल्सपैकी १६,६९८ कॉल्स नातेसंबंधातील ताण, नैराश्य, चिंता आणि तणावाशी निगडित समस्यांचे होते. महत्त्वाचे म्हणजे, ४० टक्के कॉलर्सना संवाद संपेपर्यंत तणावात तत्काळ घट जाणवली, असे संस्थेच्या विश्लेषणात नमूद केले आहे. तर, शहरी भागांत मानसिक आरोग्याविषयी जागरूकता जास्त दिसत असून, पुण्यात सर्वाधिक १,१३,४३५ तरुण पुरुषांपर्यंत हा उपक्रम पोहोचला. मुंबईत ५३,६३७ पुरुष, तर राजस्थान, दिल्ली, बंगळूर, गोवा आणि हैदराबादमधील उपक्रमांद्वारे ४० हजारांहून अधिक युवकांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.
......................................
‘पुरुष मदत मागतात तेव्हा त्यांना मिळणारा दिलासा प्रत्यक्ष जाणवतो. मुलांना ‘मजबूत राहा’ अशी शिकवण दिली जाते; पण मदत मागणे हे ही आवश्यक असून, ती कमजोरी नाही.’
-परवीन शेख, अध्यक्षा, एमपॉवर संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT