मुंबई

जव्हार नगर परिषद प्रचाराचा धुराळा

CD

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : नगर परिषदेसाठी मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान, ही निवडणूक सर्वच राजकीय पक्ष आपापल्या संघटनेच्या प्रबळ अशा स्टार प्रचारकांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचे नियोजन करीत आहे. शनिवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी जव्हार नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे गटातील सर्वच उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यांच्या या पालघर जिल्हा दौऱ्यादरम्यान जव्हार नगर परिषदेचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जव्हार शहरातील महात्मा गांधी चौक येथे शनिवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिंदे यांच्या मार्गदर्शनात महायुतीची काय भूमिका, महत्त्वाचे मुद्दे असतील हे ऐकण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी तथा उमेदवारांनी आपापले हस्तक पाठवून त्यांच्याकडून मागोवा घेतला. जव्हारविषयी माझ्या मनात आत्मियता असून, या संस्थाकालीन जव्हारच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलो आहोत आणि राहणार आहे, असे शिंदे म्हणाले.

शिवसेना शिंदे गट तसेच अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्या वतीने जव्हार शहरात सर्वच उमेदवार, कार्यकर्ते प्रचार सभेसाठी रवींद्र फाटक, वसंत चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे यांनी अमलात आणल्यापासून आदिवासी भागातील महिलांना मोठा आधार निर्माण झाल्याचे महिला बोलत आहेत. शिवाय एसटी प्रवासात अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास ही योजनादेखील हिताची असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणी सत्तेत परिवर्तन करतील काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT