मुंबई

पक्षप्रवेशावरून आरोप–प्रत्यारोप

CD

पक्षप्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप
सुरेश भोईर यांच्यावर भाजपचा हल्लाबोल

टिटवाळा, ता. २२ (वार्ताहर) : माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर स्थानिक भाजपचे मांडा-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोईर यांच्यावतीने एक विस्तृत खुलासा पत्रक जाहीर करण्यात आले आहे. भोईर यांनी पक्षप्रवेशावेळी केलेल्या विधानांवर आक्षेप घेत भाजपाने त्यांचा २००० पासूनचा राजकीय इतिहास स्पष्ट केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने स्थानिक संघटनेवर कोणताही राजकीय प्रभाव पडणार नाही, असा सूर भाजपने व्यक्त केला आहे.

भाजपाच्या म्हणण्यानुसार, सुरेश भोईर यांना सुरुवातीला स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच निवडून येण्याची संधी मिळाली. २००० मध्ये शक्तिवान भोईर हे यादी प्रमुख असताना सुरेश भोईर वॉर्ड क्र. १ मधून निवडून आले. २००५च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याचे निवेदनात नमूद आहे. २०१०मध्ये सुरेश भोईर सक्रिय नव्हते. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून उपेक्षा भोईर निवडून आल्या आणि त्यांनी २०१० ते २०१५ दरम्यान समाधानी विकासकामे केली.

२०१५मध्ये प्रभागांची पुनर्रचना झाल्यावर उपेक्षा भोईर यांना वॉर्ड क्र. ९ मधून उमेदवारी मिळाली. सुरेश भोईर यांचा मुलगा प्रदीप भोईर यांना तिकीट हवे होते. मात्र पक्षाच्या सर्व्हेत नाव नसल्याने त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय होता. स्थानिक वातावरण पाहून शक्तिवान भोईर यांनी स्वतःही न लढण्याची भूमिका घेतल्यावर प्रदीप भोईर यांना तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत प्रदीप भोईर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला, तर उपेक्षा भोईर पुन्हा विजयी झाल्या.

पराभवाचे खापर
प्रदीप भोईर यांच्या पराभवानंतर सुरेश भोईर यांनी पक्षपातळीवर व कार्यकर्त्यांवर विवाद, शिवीगाळ आणि गैरवर्तन केले, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. २०१८मध्ये उपमहापौरपदासाठी उपेक्षा भोईर यांचे नाव निश्चित केले असतानाही सुरेश भोईर यांनी विरोध केला होता. भाजपच्या मते, गेल्या पाच वर्षांत नगरसेवक नसतानाही त्यांनी विकासकामे थांबवली नाहीत. पुढील पालिका निवडणुकीत पॅनेल पद्धत लागू झाली आहे. मागील निवडणुकीतील पराभव पाहता सुरेश भोईर यांना या वेळी तिकीट मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यामुळेच त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला असावा, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT