मुंबई

जाहिरातीच्या झगमगाटात विकास हरवला

CD

जाहिरातीच्या झगमगाटात विकास हरवला
ठाणे महापालिकेचा कानाडोळा; १५ वर्षांच्या करारात ४५ कोटींचे नुकसान
हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ ः बेकायदा जाहिरातींच्या गराड्यात ठाणे शहर बकाल बनत चालले असताना ठेका पद्धतीने दिलेल्या जाहिरातींच्या झगमगाटात विकास हरवल्याचे समोर आले आहे. शहरात उभारण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेने करार पद्धतीने कंपन्यांना जाहिराती झळकवण्याचे हक्क दिले. त्यासाठी ४५ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडले; मात्र इतके करूनही विकासकामे न होताच किंवा ती सक्षमपणे न राबवताच शहरात जाहिरातबाजी जोमात सुरू आहे.

कोरोनाकाळापासून ठाणे महापालिकेच्या तिजोरीची स्थिती नाजूक बनली आहे. उत्पन्नवाढीसाठी पालिकेतर्फे विविध योजना राबवल्या जात आहेत; मात्र हक्काच्या ‘कमाई’कडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून सध्या शहरभर झळकत असलेल्या मोठमोठ्या जाहिरातींचे फलक मानले जात आहे. विकासकामांच्या मोबदल्यात जाहिरात फलक उभारण्याचे हक्क देणाऱ्या योजनेचा शुभारंभ २०१७ ला सुरू झाला. तत्कालीन पालिका आयुक्तांनी फर्स्ट राईट टू रिजेक्ट या तत्त्वावर प्रथम संकल्पना मांडणाऱ्या ठेकेदार कंपनीला कोणत्याही अनुभवाशिवाय विकासकामे करण्याची मुभा दिली. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या नियमाने ही विकासकामे अपेक्षित होती; पण बांधा आणि विसरून जा, अशी नवीन पद्धत अंगवळणी लावून त्याआडून कोट्यवधी रुपयांचा मलिदा ठेकेदार कंपन्या लाटत असल्याचे उघडकीस आला आहे.

योजनेंतर्गत सर्वात मोठा घोटाळा हा शौचालय उभारणीत झाल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेने शहरात ३० वातानुकूलित शौचालये उभारण्याच्या मोबदल्यात एका कंपनीला जाहिरात उभारण्याचे हक्क दिले होते. या कंपनीने काही ठिकाणी शौचालये न बांधताच जाहिरातींचे मोठमोठे होर्डिंग झळकवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने सुलोचनादेवी सिंघानिया शाळेबाहेर नुकतेच शौचालय बांधण्यात सुरुवात केली आहे; मात्र त्या मोबदल्यात २०२१ पासूनच जाहिराती फलक उभारले आहेत. धक्कादायक म्हणजे हिरानंदानी मेडोज येथे शौचालय न उभारताच होर्डिंग उभारले आहे. अशीच अवस्था शहरातील इतर शौचालयांची असून पालिकेडून ठोस कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

उत्पन्नावर पाणी
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेने विविध विकासकामांच्या मोबदल्यात शहरातील एकूण एक लाख ८८ हजार चौरस फुटाची जागा ही जाहिरातदार कंपन्यांना दिली आहे. सध्याच्या दरानुसार त्याद्वारे किमान आठ कोटी रुपये इतके उत्पन्न पालिकेला कंपन्यांकडून मिळणे अपेक्षित होते. बहुतेक ठिकाणी १५ वर्षांचा करार केल्यामुळे हे उत्पन्न ३०० कोटींच्या घरात गेले असते; मात्र पालिकेने आठ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना ठेका केवळ पाच कोटी ३१ लाखांना दिला. त्यामुळे पालिकेचे सुमारे ४५ कोटींचे नुकसान होत आहे. खासगी जागेतील जाहिरातींची तुलना केली असता हे उत्पन्न वार्षिक ११ कोटींच्या वर जाते.

बारगळलेले महत्त्वाचे प्रकल्प
१) २०१७ मध्ये पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे महापालिकेने सायकल स्टँड उपक्रम सुरू केला. शहरातील ५० ठिकाणी सायकल स्टँड उभारून सवलतीच्या भाडेदरात ते देण्याची योजना होती. त्या मोबदल्यात ठेकेदाराला सायकल स्टँडवर जाहिरात करण्याची मुभा देण्यात आली. आजही हे सायकल स्टँड जागोजागी धूळ खात पडले असून त्यावर जाहिराती मात्र झळकत आहेत.

२) ठाण्यातून जाणाऱ्या महामार्गांवर प्रवाशांची गैरसोय टाळावी, या उद्देशाने महापालिकेने आनंदनगर ते गायमुखपर्यंत ३० ठिकाणी वातानुकूलित शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला. ठेकेदाराने जाहिरातींच्या मोबदल्यात ही शौचालये बांधून ती सुस्थितीत ठेवणे बंधनकारक करण्यात आले; मात्र काही वर्षांतच या प्रकल्पाची र्दुदशा झाली.

३) उड्डाणपुलाखाली व्हर्टिकल गार्डनचाही असाच प्रकल्प होता. त्यातील अनेक झाडे सुकली असून जाहिरातबाजी मात्र जोमात सुरू आहे.

चौकशीची मागणी
जाहिरात घोटाळ्यासंदर्भात जागरूक नागरिक आणि वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य चंद्रहास तायडे यांनी ठाणे महापालिकेकडे चौकशीची मागणी केली आहे. सर्व शौचालयांचे ऑडिट करून दोष आढळल्यास कारवाई करण्याचीही त्यांनी निवेदनाद्वारे ठाणे पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. यासदंर्भात पालिकेच्या जाहिरात विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली; मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून योग्य कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासकामांच्या मोबदल्यातील जाहिरात दर
दिलेला दर अपेक्षित दर
जाहिरातीचे सरासरी क्षेत्रफळ १,८८,००० चौरस फूट १,८८,००० चौरस फूट
वार्षिक ठेका (किंमत) ५ कोटी ३१ लाख ८ कोटी
उत्पन्न (१५ वर्षांमध्ये अंदाजे) १०० कोटी १२० ते ४०० कोटी (वाढीव दरानुसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT