मुंबई

समाजमाध्यमांवर राजकीय सारीपाटाचा खेळ

CD

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २४ : वसई-विरार महापालिकेची निवडणूक पाच वर्षांहून अधिक काळ रखडली. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. आता लवकरच निवडणूक होण्याचे संकेत मिळत असल्याने ‘इच्छुकांची वारी मतदारांच्या दारी’ असा प्रवास सुरू झाला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांबरोबरच महापालिका नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी समाजमाध्यमांवर प्रचार करण्यासाठी सुरुवात केली असून, हा राजकीय सारीपाटाचा खेळ रंगला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रभागरचना, प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून, एकूण २९ प्रभागांत ११५ सदस्य निवडून येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात महायुती, महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी यासह अपक्ष व अन्य पक्षांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या पातळीवर प्रचाराच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यावर होणार आहे, मात्र आपल्या प्रभागातील वॉर्डमध्ये इमारत, बैठ्या घरांमध्ये मतदार किती आहेत, वास्तव्य करणाऱ्यांची संख्या यासह माहितीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे तसेच मतदार यादीतील घोळ, त्रुटीदेखील शोधून काढण्यात येत आहेत.

पक्षांची अदलाबदली केलेल्यांना आपल्याला तिकीट मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाच वॉर्डमधून अनेक इच्छुकांचे चेहरे समाजमाध्यमांवर दिसू लागले आहेत. एकनिष्ठ कार्यकर्ता, नागरिकांच्या हितासाठी लढणारा, कर्तव्यनिष्ठ, टक्कर देणारा, विकासकामांसाठी सदैव तत्पर यासह विविध घोषवाक्ये वापरून स्वतःचा चेहरा तसेच पक्षाचे नेतृत्व करणारी मंडळी आदींच्या छायाचित्रासहित रील्स व फोटो वापरून समाजमाध्यमांवर टाकले जाऊ लागले आहेत. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कमेंट, लाईक केले जात असल्याने आपल्याला पसंती किती जण देत आहेत, याची जणू काही स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभावी समजले जाणारे समाजमाध्यम कोणासाठी हिताचे ठरेल व तिकीट मिळविण्यात यश येईल की खरोखरच नागरिकांच्या समस्यांसाठी भेटीगाठी घेऊन तळागाळात काम करणाऱ्याला पक्षाकडून तिकिटाची लॉटरी लागेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इच्छुकांची गर्दी, पक्षाला डोकेदुखी
बहुजन विकास आघाडी, भाजप हे प्रमुख पक्ष महापालिका निवडणुकीत सामनेसामने येणार आहेत. त्यातच शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच नगरसेवकपदाचे तिकीट मिळाले पाहिजे, याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. एकाच प्रभागातून अनेक इच्छुक समाजमाध्यमांवर झळकत आहेत. त्यामुळे पक्षाकडून कोणाला तिकीट द्यायचे, असा वरिष्ठांसमोर पेच निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT