मुंबई

घोळ काही सुटेना

CD

वसई तहसीलदार पदभाराची ''मामलेदार मिसळ''
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने घोळ!
विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई तालुक्याच्या तहसीलदार पदाचा कार्यभार सोपवण्यावरून पालघर जिल्हा प्रशासनाने केलेल्या वारंवार बदलांमुळे मोठा घोळ निर्माण झाला आहे. माजी तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी शनिवारी (ता. १५) पदभार सोडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ व्यवस्था न केल्याने या पदाची "मामलेदार मिसळ" झाल्याची चर्चा आहे.
सुरुवातीला, निवासी नायब तहसीलदार (आरएनटी) राजाराम देवकाते यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला होता; मात्र पाच दिवसांनंतर (ता. २०) जिल्हा प्रशासनाने अचानक हा पदभार देवकाते यांच्याकडून काढून घेऊन त्याच कार्यालयातील वसई (बिनशेती) अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे यांच्याकडे सोपवला. जिल्हा प्रशासनाने केलेली ही ''चूक सुधारणा'' आहे की आणखी काही घोळ, हे स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत नव्या तहसीलदारांची नियुक्ती होऊ शकते. जर महसूलमंत्र्यांकडून लगेच घोषणा झाली नाही, तर पुढील दोन ते तीन महिने ही नियुक्ती होऊ शकणार नाही. याची कुणकुण लागल्यानेच जिल्हा प्रशासनाने नायब तहसीलदारांकडून पदभार काढून अप्पर तहसीलदारांकडे सोपवला असावा, असे बोलले जात आहे. या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो मात्र झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीचा निर्णय लवकरच, बावनकुळेंची कोल्हापुरात ग्वाही

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

Winter Tips: तुमचेही हिवाळ्यात केस खुप गळतात का? मग घरच्या घरी 'हे' सोपे उपाय

Horoscope Prediction : आठव्या घरात गुरु ग्रहाची छाया! कामधंदा, नातेसंबंध अन् मानसिक शांतीवर होईल गंभीर परिणाम, आजच करा हा सोपा उपाय

PM Narendra Modi Blog : "माझ्या सारखा गरीब माणूस पंतप्रधान झाला कारण.." मोदींनी सांगितली जुनी आठवण, हत्तीवरून संविधान...

SCROLL FOR NEXT