मुंबई

मनसेचा बालेकिल्ला भेदणार का ?

CD

मनसेचा बालेकिल्ला भेदणार का?
घाटकोपर पश्‍चिमेत भाजप अधिक शक्‍ती लावणार
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. २६ : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १२६ हा पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. २०१७मध्ये मनसेने दमदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर घडलेल्या राजकीय हालचालींनी या प्रभागाचा राजकीय पटच बदलून गेला. या वेळी ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे या प्रभागावर मनसे-शिवसेना युतीचा वरचष्मा राहील, असे म्हटले जात आहे. तरीही हा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपही या वेळी अधिक जोर लावणार आहे.
या प्रभागात जगदुशानगर, इंदिरानगर, साईनाथनगर, नित्यानंदनगर, दामोदर पार्क, नाबार्ड कॉलनी हे प्रमुख परिसर येतात. एकूण लोकसंख्या ५६,९४९ असून, २०२५मध्ये मतदारांची संख्या वाढली आहे. येथे सर्वाधिक मतदार मराठी भाषिक आहे. त्याखालोखाल मुस्लिम, गुजराती, जैन आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. २०१७मध्ये हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी राखीव होता, तर २०२५मध्ये आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत डॉ. अर्चना संजय भालेराव यांनी तब्बल साडेसहा हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या पूनम बोराटे तर शिवसेनेच्या स्वाती शितप तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यापूर्वी २०१२च्या निवडणुकीत संजय भालेराव यांनी मनसेकडून लढत दोन टर्मच्या नगरसेविका राहिलेल्या शिवसेनेच्या सरस्वती भोसले यांचा पराभव केला होता. तेव्हापासून प्रभाग १२६ हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.

लोकसभा, विधानसभेचे चित्र
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय दिना पाटील हे विजयी झाले. तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम कदम सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. या प्रभागात भाजपने दोन हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. तर शिवसेनेच्या उमेदवार संजय भालेराव यांना ९,२३५ मते मिळाली होती.

राजकीय उलथापालथी
२०१७च्या निकालानंतर सहा महिन्यांत राजकीय उलथापालथ झाली. निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी एकीकृत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या ठिकाणी मनसेचे जुने कार्यकर्ते आजही निष्ठावान असून, राजकीय वादळातही प्रभागात मनसेचा जनाधार टिकून आहे. ठाकरे बंधूंमध्ये युती झाल्यास हा प्रभाग मनसेला सोडावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

प्रमुख समस्या
- गटारे, नालेसफाई अपुरी
- इंदिरानगर, आनंदनगर, शिवकृपा भागातील शौचालयांचे काम प्रलंबित
- बाबू गेनू मैदान बंद असल्यामुळे खेळाडू आणि नागरिकांची मोठी गैरसोय
- मैदानात पार्किंग

२०१७ पालिका निवडणुकीचा निकाल
- एकूण मते- २४,९८६
- विजयी उमेदवार - डॉ. अर्चना संजय भालेराव (मनसे) - १२,७५९
- पूनम बोराटे (भाजपा) ६,०८९
- स्वातीताई शितप ( शिवसेना) - ५,६२३
- नोटा - ५१५

शौचालयाची कमतरता ही मोठी समस्या आहे. पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न कायम आहे. मतदारांचा विचार न करता ऊठसूठ पक्षप्रवेश होतात, हे कुठे तरी थांबले पाहिजे.
- बाळासाहेब शिंदे, स्थानिक नागरिक

मुलांना खेळण्यासाठीच्‍या मैदानात गाड्या पार्क केल्या जातात. दत्त मंदिर येथील शौचालयाचे काम खूप धीम्यागतीने सुरू आहे. या समस्या सोडवणारा नगरसेवक हवा.
- विजय पांडे, स्थानिक नागरिक

प्रभागाचा विकास झाला पाहिजे. स्वच्छतेवर जास्त भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे नालेसफाई केली पाहिजे.
- सोहम गाडगे, नवमतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Latest Marathi News Live Update: हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

SCROLL FOR NEXT