मुंबई

शिवाजीनगर पालिका रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव

CD

पालिका रुग्णालयात सुविधांची वानवा
गोवंडीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
चेंबूर, ता. २६ (बातमीदार) : गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात असलेल्या पालिका रुग्णालयात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार हे रुग्णालय पूर्णवेळ आणि ''ट्रॉमा''च्या धर्तीवर सुरू करण्याची तीव्र मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
गोवंडी, देवनार, आणि शिवाजीनगर परिसरात डंन्पिंग ग्राउंड, एस.एम.एस. कंपनी, पशुवध गृह आणि रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, दमा, त्वचेचे आणि साथीचे रोग झपाट्याने पसरत असल्याने येथील सुमारे आठ लाख सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पालिकेने गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये सात मजली रुग्णालय उभारले आहे. कोविड-१९ साथीच्या काळात येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले होते; मात्र सद्यस्थितीत या रुग्णालयात केवळ प्रसूतीगृह विभाग आणि ''आपला दवाखाना'' सायंकाळपर्यंतच सुरू असतो.
रुग्णालयाच्या इमारतीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही इमारत ओसाड पडली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनावर केला आहे. नागरिकांनी पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हे रुग्णालय पूर्णवेळ आणि ट्रॉमा केअरच्या सुविधांसह सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसंदर्भात पालिका एम पूर्व विभागातील वैद्यकीय अधिकारी प्रदीप कशाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

अपुऱ्या सुविधामुळे जीव धोक्यात
पूर्णवेळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एखादा गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिला असल्यास त्यांना उपचारासाठी घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी किंवा सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पोहोचवण्यात होणाऱ्या विलंबाने आजपर्यंत कित्येक महिलांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब नागरिकांनी नमूद केली आहे.
......................................
शिवाजी नगर पालिका रुग्णालयाकडे पालिका प्रशासन व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. राजावाडी व शताब्दी रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय सुरू करण्यात यावे.
- जमील खान, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार? आमदार पोहोचले दिल्लीत; काँग्रेस अध्यक्षांनी दिले 'हे' संकेत

Pune Metro News : पुणेकरांसाठी Good News! ; मोदी सरकारची पुणे मेट्रोच्या 'या' दोन महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी

Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचे काम कधी पूर्ण होणार? जाणून घ्या प्रकल्पाची सध्याची स्थिती...

IND vs SA: 'गौतम गंभीर हाय हाय...' भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षकाच्या समोरच चाहत्यांची घोषणाबाजी; Video Viral

Latest Marathi News Live Update: महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर

SCROLL FOR NEXT