मुंबई

डहाणू बस स्थानकात तिसरे सर्वेक्षण पूर्ण

CD

डहाणू बस स्थानकात तिसरे सर्वेक्षण पूर्ण

कासा, ता. २५ (बातमीदार)ः स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत’ डहाणू बस स्थानक आणि डेपोचे तिसरे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले.
दर तीन महिन्यांनी या उपक्रमात बस स्थानकांचे मूल्यांकन केले जाते. यासाठी प्रादेशिक स्तरावर स्वतंत्र मूल्यांकन समिती स्थापन करण्यात आली आहे. बस स्थानकांची अ, ब आणि क वर्गानुसार श्रेणी निवड केली जाणार असून स्वच्छता, सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधा यांसारख्या बाबींवर या सर्वेक्षणात गुणांकन केले जाते. यावेळी डहाणू आगारचे अधिकारी अजित अवतार, डहाणू आगार प्रमुख व्यवस्थापक चेतन देवधर तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. सर्वाधिक स्वच्छ आणि सुविधाजनक बसस्थानक निवडण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण मानले जात असून, या उपक्रमामुळे बसस्थानकांची गुणवत्ता वाढून प्रवासी सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डहाणू बसस्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी रायगड विभागाचे वरिष्ठ उपभियंता एस. चव्हाण, रायगड विभाग नियंत्रक आर.बी. चौरे यांनी दोन दिवसांपूर्वी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - नक्षलमुक्तीच्या दिशेने

मोठी बातमी! राज्यात होणार १८००० कंत्राटी शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी निर्णय; माध्यमिक शाळांसाठी ‘हा’ निर्णय

आजचे राशिभविष्य - 26 नोव्हेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2025

समस्येची उकल करताना...!

SCROLL FOR NEXT