कामोठेतील गतिरोधक दुर्लक्षित
पनवेल (बातमीदार) ः कामोठे वसाहतीमध्ये पनवेल पालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत; पण वसाहतीमधील जुन्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने गतिरोधकांवर सुरक्षात्मक चिन्हांकन नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. कामोठे वसाहतीमधील नागरिकांनी माजी नगरसेवक विकास घरत यांच्याकडे तक्रार केली. घरत यांनी तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करून अनेक ठिकाणी गतिरोधकांची दुरवस्था पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. तसेच लेखी निवेदनातून सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे सुरक्षा पट्टे मारावेत, अशी मागणी केली आहे.