मुंबई

ठाण्याच्या शिल्पकार सतीश प्रधान यांच्या स्मरणार्थ २८ नोव्हेंबरपासून ‘अक्षतांजली’ कार्यक्रमाला सुरूवात..

CD

‘अक्षतांजली’ कार्यक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात
ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान यांच्या स्मरणार्थ आयोजन
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : ठाण्याच्या शहरी विकासातील दूरदृष्टीसाठी ओळखले जाणारे सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ‘अक्षतांजली’ स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, नगरविकास, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रांतील त्यांचा मोलाचा वाटा लक्षात घेऊन २८ नोव्हेंबरपासून महिनाभर या कार्यक्रमांची मालिका सुरू होणार आहे.
या कार्यक्रमांबाबत माहिती कमलेश प्रधान यांनी दिली. या वेळी सह सचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, प्रा. संज्योत देऊसकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्मृती सोहळ्याचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. २८) राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात प्रवीण दवणे यांच्या शब्दांतून ठाण्याच्या अस्मितेला साद घालणारे ठाणे अभिमान गीत प्रदर्शित होणार आहे. वैशाली सामंत व श्रीरंग भावे यांच्या आवाजात गायलेले हे गीत स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केले आहे. अक्षतांजलीअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, ज्यात इकोफ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन, आंतरशालेय आणि महाविद्यालयीन चित्रकला व पोस्टर स्पर्धा, सतीश प्रधान ठाणे दौड, पुस्तक प्रदर्शन, कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय रोजगार मेळावा व रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. महिनाभर चालणारा हा उत्सव ठाण्याच्या प्रगतीचे मार्गदर्शक सतीश प्रधान यांच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.


‘अक्षतांजली’ अंतर्गत कार्यक्रमांची रूपरेषा
१) ऊर्जासेतू - इकोफ्रेंडली वस्तू आणि सामाजिक उपक्रम प्रदर्शन
१३ डिसेंबर | ९.३० - ५.०० | ज्ञानसाधना महाविद्यालय
२) चित्रकला स्पर्धा - आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन (कनिष्ठ)
१६ डिसेंबर | १०.३० - १२.३० | ज्ञानसाधना महाविद्यालय
३) सतीश प्रधान ठाणे दौड - शहरस्तरीय रनिंग इव्हेंट
१७ डिसेंबर | ९.३० - ५.०० | ज्ञानसाधना महाविद्यालय
४) पुस्तक प्रदर्शन - ‘यांनी घडविले ठाणे’
१८-२० डिसेंबर | १०.०० - ५.०० | राम देवळे मध्यवर्ती ग्रंथालय
५) एकदिवसीय परिषद - ‘ठाणे व्हिजन २०४७ : काल, आज आणि उद्या’
१८ डिसेंबर | ९.३० - २.०० | ज्ञानसाधना महाविद्यालय
६) पोस्टर स्पर्धा - आंतरमहाविद्यालयीन (वरिष्ठ)
१९ डिसेंबर | १०.३० - १२.३० | ज्ञानसाधना महाविद्यालय
७) निबंध स्पर्धा
१९ डिसेंबर | १२.०० - १.३० | ज्ञानसाधना महाविद्यालय
८) कबड्डी स्पर्धा
२० डिसेंबर | सकाळी ८.०० | श्री मावळी मंडळ, ठाणे
९) राज्यस्तरीय रोजगार मेळावा
२० डिसेंबर | ८.०० - ४.०० | ज्ञानसाधना महाविद्यालय
१०) रक्तदान शिबिर
२३ डिसेंबर | १०.०० - ५.०० | ठाणे रेल्वेस्थानक
११) ‘अक्षतांजली’ - स्मृती सोहळा समारोप
२९ डिसेंबर | ५.०० - ८.०० | ज्ञानसाधना महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी ! तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित; उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित होणार !

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर ओपनिंगला आला... १२७च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा; पण अभिनव तेजराणाची हवा...

संतोष जुवेकर लग्नबंधनात अडकणार? प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला...'जिथं प्रेम तिथं अ‍ॅडजस्टमेंट...'

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या ‘स्मरणशक्ती’साठी पंचामृत अभिषेक

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

SCROLL FOR NEXT