मुंबई

खालापूर नगरपरिषद निवडणुकीत अपक्षांची लगीन घाई

CD

खालापूर नगरपरिषद निवडणुकीत अपक्षांची लगीन घाई
प्रचारासाठी मिळणार अवघे पाचच दिवस; उमेदवारांची कसरत सुरू
खालापूर, ता. २६ (बातमीदार) : नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघे सात दिवस राहिल्याने अपक्ष उमेदवारांची धावपळ आणि लगीन घाई सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची अंतिम टप्प्यातील तयारी वेगात सुरू असून, नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवारी अपक्ष उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चि न्हांचे वाटप करण्यात आले.
२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे हातात केवळ पाच दिवसांचा काळ उरल्याने अपक्ष उमेदवारांची मोठी अडचण होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः, आपले नाव आणि निवडणूक चिन्ह जवळपास पन्नास हजारांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचवणे हे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. त्यांच्या प्रचारासाठी आता अक्षरशः जिवाचा आटापिटा करण्याची वेळ आली आहे. खोपोली नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी चार उमेदवार अपक्ष असल्याने ही लढत त्रिरंगी किंवा चौरंगी लढतीच्या रूपात रंगण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवारांकडे वेळेची कमतरता असताना, संघटित पक्षांच्या उमेदवारांनी मात्र आठवडाभर आधीच जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षीय उमेदवारांचे बॅनर, फलक, रॅली आणि कोपरा सभा शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे स्पर्धेमध्ये पक्षीय उमेदवारांना नैसर्गिक आघाडी मिळाल्याचे चित्र असले तरी, अपक्ष उमेदवारही शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अल्प वेळ, मर्यादित साधनसामग्री आणि वाढती स्पर्धा यामुळे खालापूर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच चुरशीचे झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

Pune Crime : आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या खात्यात २१ कोटी; खंडणीची रक्कम असल्याचा पोलिसांचा दावा

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

SCROLL FOR NEXT