मुंबई

खडेगोळवलीत दूषित पाण्याचा त्रास

CD

खडेगोळवलीत दूषित पाण्याचा त्रास
लहान मुले, महिला आजारी पडल्याने आरोग्य विभागाची धावपळ
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : खडेगोळवली परिसरातील रामा कृष्णा कॉलनी, पार्वतीनगर, पंचवटी कॉलनी आणि आसपासच्या भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना नळातून येणाऱ्या पाण्यात दुर्गंधी आणि गढूळपणा जाणवत आहे. यामुळे अनेकांना वांती, जुलाब, अंगदुखी यांसारखे आजार होत असल्याची तक्रार नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केल्याचे समजते. याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली असून, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
स्थानिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देत आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित परिसराची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तर नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना म्हणून नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी निर्जलीकरण औषधांचे वाटप सुरू केले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तपासणी अहवाल आल्यानंतर दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून आवश्यक ती पावले उचलली जातील.

अधिकारी घटनास्थळी
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मयूर शिंदे आणि शिवाजी रसाळ यांनी परिसरातील जलवाहिन्या आणि जलसाठ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असून, येत्या काही दिवसांत दूषित पाण्याची समस्या पूर्णतः निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी सध्या पाण्याचे योग्य प्रकारे गाळून आणि उकळूनच प्राशन करावे तसेच शंका असल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नव्या जलवाहिनीची मागणी
परिसरात काही ठिकाणच्या जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून, त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे एकाच जलवाहिनीला सतत दुरुस्त केल्याने समस्या कायमस्वरूपी संपत नाहीत. नागरिकांना होणारा त्रास पाहता पालिकेने जीर्ण जलवाहिन्या काढून नवीन टाकायला हव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे पदाधिकारी जगदीश तरे यांनी केली आहे. मात्र सध्या खोदकाम करून जलवाहिन्यांमध्ये असणाऱ्या तांत्रिक त्रुटी शोधण्याचे कार्य सुरू आहे. आवश्यकता भासल्यास अहवाल बनवून नव्या जलवाहिनेसाठी आम्ही प्रयत्न करू, असे या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी मयूरी शिंदे म्हणाल्या.

दूषित पाण्यामुळे आजार आणि घ्यावयाची काळजी
दूषित पाण्याने मुख्यत्वेः पोट व आतड्यांशी संबंधित आजार वाढतात. त्यामुळे जुलाब, उलटी, पोटदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा, कावीळ व टायफॉइड, कॉलरा, आमांश, हिपॅटायटीस ए यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. वेळेवर काळजी घेतली तर यापैकी बहुतांश आजार टाळता किंवा सौम्य ठेवता येतात. पाणी किमान १०-१५ मिनिटे उकळून थंड झाल्यावरच प्या, शक्य असेल तर गाळून किंवा फिल्टर करूनच वापरा. जुलाब-उलटी सुरू झाल्यास लगेच ओआरएस, लिंबूपाणी, ताक, स्वच्छ पाणी यांसह भरपूर द्रवपदार्थ घ्या. लघवी कमी होणे, चक्कर, अतिशय अशक्तपणा वाटल्यास तत्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Basketball Player Death : सराव करताना खांब अंगावर पडून बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू; क्रीडा अधिकारी निलंबित!

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

SCROLL FOR NEXT