मुंबई

अंबरनाथमध्ये राजकीय नाट्य

CD

अंबरनाथमध्ये राजकीय नाट्य
अंबरनाथ ता. २७ (वार्ताहर) : अंबरनाथमधील स्थानिक राजकारणाला बुधवारी मोठे वळण मिळाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष बदलल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, प्रसिद्ध उद्योजक आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग धल यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना तीन वेळा स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देऊनही पूर्तता न झाल्याने, तसेच पक्षाकडून वारंवार डावलले गेल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय घेतला. दीर्घकाळ काम करूनही संधी मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

धल यांच्या प्रवेशानंतर काही तासांतच भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. रोझलीन फर्नांडिस यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपात स्वतःला तसेच आपल्या समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप करत आणि उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मनीषा वाळेकर यांना पाठिंबा
डॉ. रोझलीन फर्नांडिस यांच्यासोबत ख्रिश्चन समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. वाळेकर यांच्या सामाजिक कार्याचा हवाला देत, त्या महिलांच्या व समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडवतील, असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला.

शिवसेनेची भूमिका
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र वाळेकर यांनी या राजकीय हालचालींवर भाष्य केले. "स्थानिक पातळीवर युती धर्म पाळला जात नसल्याने आम्हीही ‘जशास तसे उत्तर देऊ," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.यावेळी तृतीयपंथीय समाजाने देखील शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat Election : नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी निर्णय

Indian Railway: रेल्वेतील चहा-नाश्ताच्या जादा वसुलीला ब्रेक लागणार! आयआरसीटीसीची नवी योजना

Tractor Accident : हृदय पिळवटणारी घटना! आईचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् सख्ख्या बहीण-भावाचा माऊलीच्या डोळ्यादेखत झाला अंत

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

IND vs SA : शुभमन गिल OUT, ७ खेळाडू IN ! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघात झाले बदल

SCROLL FOR NEXT