मुंबई

भातगिरणीच्या जागा विक्रीला स्थगिती

CD

भातगिरणीच्या जागा विक्रीला स्थगिती
खालापूरच्या निबंधक कार्यालयाला तहसीलदारांचे आदेश
खालापूर, ता. २७ (बातमीदार) ः तालुक्यातील चौक गावातील नेताजी सहकारी भातगिरणी सोसायटीची मालमत्ता विक्रीला स्थगिती देण्यात आली. याबाबतचे निर्देश तहसीलदार अभय चव्हाण यांनी खालापूरचे सहाय्यक सहकारी निबंधक कार्यालयाला बजावले आहेत.
नेताजी सहकारी भातगिरणी सोसायटीची चौक-तुपगाव मार्गावर मोक्याच्या ठिकाणी जवळपास २३ गुंठे जागा आहे. चौकमधील गुंठ्याला ही जागा खासगी विकसकाला विक्री करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबतची माहिती मिळताच अखिल गुरव समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य मुख्य सरचिटणीस, विजय ठोसर यांनी विरोध दर्शवला. या प्रकरणात सोमवारी (ता. २४) तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये नेताजी सहकारी भातगिरणीच्या चेअरमनने भातगिरणीच्या सभासदांच्या परवानगीशिवाय जमीन विक्रीचा आरोप केला आहे. खालापूरचे सहाय्यक सहकारी निबंधक कार्यालयाशी संबंधित हे प्रकरण असल्याने तहसीलदार अभय चव्हाण यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मालमत्ता विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : १ डिसेंबरला नेमकं काय होणार? CJI सूर्यकांतांचा गूढ इशारा… सुप्रीम कोर्टात मोठा बदल की काहीतरी वेगळंच?

Latest Marathi News Live Update : मुर्तिजापूरात आज भाजपची विजय संकल्प सभा; स्टार प्रचारक आमदार रवींद्र चव्हाण, नवनीत राणा साधणार संवाद

Srirang Barge: ‘एसटी’ला मिळणार आठ हजार नव्या गाड्या ; सरचिटणीस श्रीरंग बरगे; नव्या गाड्यांना कंत्राटी चालक भरती प्रक्रियेचा फेरविचार करावा

Leopard News Pune : घाबरू नका, पण सावध राहा! औंधकरांसाठी वनविभागाने जारी केल्या बिबट्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना

'राष्ट्रवादी'च्या विद्यार्थी प्रमुखानं रेल्वेखाली उडी मारून संपवलं आयुष्य; घुगेंच्या मृत्यूने खळबळ, धनंजय मुंडेंचे होते निकटवर्तीय

SCROLL FOR NEXT