ऐतिहासिक वारसा संकटात
घारापुरी बेटाला प्लॅस्टिकचा विळखा, पर्यटनावर परिणाम
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : लेण्यांचा जागतिक ऐतिहासिक वारसा असलेल्या घारापुरी बेटावरील जैवविविधता प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे धोक्यात आली आहे. या प्रकाराकडे कांदळवन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पर्यटनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईच्या जवळ उरण तालुक्यात अरबी समुद्रातील घारापुरी बेटाची (एलिफंटा आयलंड) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद आहे. दरवर्षी लाखो परदेशी प्रवासी लेणी तसेच बेटावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येथे येतात. मात्र हा वारसा आता नव्या संकटांशी सामना करीत आहे. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे येथील खारफुटीची अवस्था गंभीर बनली आहे. बेटाच्या पूर्व, दक्षिण किनाऱ्यावर पिशव्या, बाटल्या असा अविघटनशील कचरा साचला आहे. भरतीच्या लाटा, समुद्री प्रवाहामुळे थेट किनाऱ्यावरील कांदळवने, खारफुटी झाडांमध्ये अडकतो. त्यामुळे जलचरांच्या अधिवासाला मोठा फटका बसू लागला असून, मुंबईतील किनारपट्टी, जहाज वाहतुकीच्या मार्गामुळे हा कचरा येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
-----------------------
मुख्य आव्हाने
- प्लॅस्टिकमुळे मातीची रचना बदलते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. त्याचा जलचरांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होतो. दीर्घकाळ संचय झाल्यास खारफुटीचे जंगल सुकण्याचा धोका असतो.
- घारापुरीकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा व्यवस्थापन, बोटींच्या कचरा नियंत्रणावरील नियमांची अंमलबजावणी आणि पर्यटकांना जनजागृती करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. समुद्रकिनारी पर्यावरणीय संरक्षणाची पहिली रेषा मानली जाते.
- वन विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम सुरू करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
---------------------------------------
घारापुरी बेटाची परिस्थिती
- राज बंदर, शेत बंदर आणि मोरा बंदर तीन गावे
- दीड हजार लोकसंख्या
- मासेमारी, पर्यटन हाच व्यवसाय
- चार लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.