मुंबई

दिवसा प्रचार, रात्री हाणामारी

CD

दिवसा प्रचार, रात्री हाणामारी
अंबरनाथ-बदलापूरमध्ये कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत शहरात गुन्हेगारीला उधाण आले आहे. पोलिस बंदोबस्त आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा कार्यरत असतानाही रात्री हाणामारी आणि दिवसा प्रचार असे हिंसक राजकारण पेटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या कारवाईचा अभाव यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दोन्ही शहरांत सलग घडलेल्या गंभीर घटनांमुळे हाणामारीचे राजकारण चिघळले आहे. अंबरनाथ पश्चिम प्रभाग ५मध्ये भाजप उमेदवार प्रजेश तेलंगे यांचे बंधू सत्यम तेलंगे यांच्यावर थेट कोयत्याने हल्ला केला. तसेच न्यू कॉलनी परिसरात शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची गंभीर घटना घडली. बदलापूरच्या प्रभाग १मध्ये पैशांच्या वाटपाच्या वादातून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार तुकाराम म्हात्रे आणि भाजप-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार प्रभाकर पाटील यांच्यात तुफान हाणामारी झाली. तसेच भाजप व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाल्याची नोंद आहे.

बदलापूरमध्ये ४९ जागांसाठी १६१ तर अंबरनाथमध्ये ५९ जागांसाठी २६० उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना राजकीय राडे, हत्यारे आणि टोळक्यांचे स्वैर वर्तन पाहता, पोलिस प्रशासनाची कारवाई केवळ औपचारिकतेपुरतीच उरल्याची टीका नागरिक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे. अंबरनाथमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट), तर बदलापूरमध्ये शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी युती असा ताणतणाव चिघळत चालला आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
जुने वाद उफाळून येत असताना पोलिसांनी संवेदनशील प्रभागांत कडक बंदोबस्त लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या कारवाईचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. शहरात बंदोबस्त असूनही गुन्हे कसे घडत आहेत आणि राजकीय दबावामुळे पोलिस प्रशासन गप्प का, असे थेट प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पोलिसांची निष्क्रियता, राजकीय दबावाखालील निर्णयक्षमता आणि नियंत्रण प्रणाली कोलमडल्यासारखी वाटत आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा कागदोपत्री मजबूत दिसत असतानाही प्रत्यक्ष कृतीत पोलिसांची पकड सैल झाल्याचा आरोप आहे. लोकशाही प्रक्रियेत शांतता राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचीच कार्यक्षमता शंकास्पद असणे, हा सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर इशारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Latest Marathi News Live Update: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

SCROLL FOR NEXT