मुंबई

थकबाकीदारांना थेट दणका

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : अभय योजनेत दंडावर दिलेल्या सवलतीनंतरही थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर पनवेल महापालिकेतर्फे कठोर कारवाई केली जाणार आहे. १८ जुलैला सुरू झालेल्या अभय योजनेला करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे; मात्र तळोजा एमआयडीसीतील काही उद्योजकांनी पाठ फिरवली आहे. महापालिकेला २८३ कोटींची थकबाकी उद्योजकांनी थकवले आहे, अशा उद्योजकांवर लवकरच नोटीस देऊन कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रशासनाची धडपड अद्याप सुरूच आहे. साडेतीन लाखांच्या घरात महापालिकेच्या हद्दीत मालमत्ता येतात. यापैकी निवासी मालमत्तांचा बहुतांश समावेश होतो. महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बहुतांश मालमत्ता सिडको वसाहतीमधील असल्याने दुहेरी कर निर्धारण करण्यावरून महापालिकेचा नागरिकांसोबत वाद सुरू आहे. या वादात तळोजा एमआयडीसीतील उद्योजकांनीही सहभाग घेतला आहे; परंतु न्यायालयाने पनवेल महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असून मालमत्ता कर भरण्याचे आदेश उद्योजकांना दिले आहेत; परंतु काही उद्योजक मालमत्ता कर भरण्यास अद्याप चालढकल करीत आहेत. याउलट रहिवासी परिसरातून महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिकेने १८ जुलैपासून सुरू केलेल्या दंडावरील सवलतीला सिडकोनिर्मित वसाहतींसह पनवेल शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद लाभला आहे. मालमत्ता कर हे महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असून या माध्यमातून नागरी विकासकामे करता येणार आहेत. पनवेल महापालिका ही ड वर्गातील महापालिका असल्याने फारसे उत्पन्नाचे साधन नसल्याने मालमत्ता कर हाच महत्त्वाचा पर्याय आहे; परंतु काही उद्योजकांच्या आडमुठ्या धोरणामुळे मालमत्ता कर भरण्यास होत असलेल्या दिरंगाईचा तिजोरीवर परिणाम होत आहे.

महापालिका ॲक्शन मोडवर
नवी मुंबई महापालिकेनेही मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. महापालिकेचे मालमत्ता कर थकविणाऱ्या २१८ जणांना ४८ तासांमध्ये जप्तीची नोटीस बजावली आहे. सात दिवसांपूर्वी दिलेल्या या नोटिसीच्या कालावधीत मालमत्ता कर न भरल्यास मालमत्तेची अटकावणी करण्याची कारवाई महापालिकेतर्फे केली जाणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने अभय योजना लागू केली होती. या योजनेमध्ये सुरुवातीला दंडावर ९० टक्क्यांनंतर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली होती; मात्र त्यानंतरही मालमत्ता कर न भरणाऱ्यांना नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे.
- स्वरूप खारगे, उपायुक्त, मालमत्ता कर विभाग, पनवेल महापालिका

एकूण उद्योजक मालमत्ता - २,३४२
मालमत्ता कर जमा - १,३१३
कर थकबाकी - १,०२९

एमआयडीसी भागातून नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी
मालमत्ता कराचे उद्दिष्ट - ३८९ कोटी २६ लाख
एकूण कर वसुली - १३० कोटी २३ लाख
एकूण थकबाकी - २८३ कोटी ९५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कोर्टाने आदेश दिला म्हणून शरण आलो', जामीनावर बाहेर येताच मंत्रिपुत्राची पुन्हा 'दादागिरी'

Latest Marathi News Live Update : केऱ्हाळा जिल्हा परिषद गटात निवडणूक नात्यांची कसोटी ठरत असल्याचे चित्र

विदेशात करिअर करायचंय? वर्ल्ड बँक Pioneers Internship 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; आजच या संकेतस्थळावर क्लिक करा!

WPL Playoff Scenario : मुंबई इंडियन्स बाद फेरीत कसा प्रवेश मिळवणार? ७ पैकी जिंकलेत ३ सामने; दिल्ली, गुजरात यांच्याकडे जास्त संधी

Mumbai Thane Traffic Update : मुंबई -ठाणे वाहतूक कोंडी संपणार! दिड तासांचा प्रवास २५ मिनीटांत, मुंबई महापालिकेचा नवा प्लॅन असा

SCROLL FOR NEXT