उल्हासनगरात शिवसेना-भाजप संघर्ष शिगेला
‘पीएम आवास’वरून राजकीय भूकंप
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेवरून राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी योजनेला विरोध करताना थेट न्यायालयात धाव घेतल्याने शहरातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी आपले न्यायालयीन लढ्याचे कारण स्पष्ट करताना थेट सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले की, घरकुल व्हावं, पण कायदा मोडून नाही. विकास हवा, पण भ्रष्टाचाराच्या जोरावर नाही! त्यांच्या म्हणण्यानुसार, हा विरोध राजकीय नसून, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आहे. त्यांनी प्रकल्पातील खालील गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवले.
उल्हासनगर भाजपने पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी योजनेला विरोध करत उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याचा गंभीर आरोप केला. भाजप आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया व माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या मते, शिवसेना एका बाजूने योजनेचे श्रेय घेते, तर दुसरीकडे त्यांचाच वरिष्ठ नेता प्रकल्प न्यायालयात आव्हान देऊन रोखण्याचा प्रयत्न करतो, ही सरळसरळ नागरिकांची दिशाभूल आहे.
राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध हा भाजप किंवा शिवसेना विरुद्ध नाही. काम पद्धतशीर आणि कायद्याने व्हावे यासाठीच त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ते म्हणाले की प्रकल्पासंदर्भातील कागदपत्रे, भूखंडाचा ताबा, आरक्षण स्थिती आणि डीपीआरची नोंद व्यवस्थित न करता निविदा काढण्यात आल्या आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे.
सीआयडीमार्फत चौकशी करा
भुल्लर महाराजांनी पीएमसी नियुक्तीतही गंभीर संशय व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७२३ कोटींपैकी किमान ३६१ कोटींच्या कामाचा अनुभव असलेली कन्सल्टन्सी नियुक्त करणे अपेक्षित होते, परंतु आवश्यक अनुभव नसलेल्या कन्सल्टन्सीला प्रकल्प देण्यात आला. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पालिका प्रशासनाविरोधात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन येथे तक्रार दाखल केल्याचे सांगितले असून, या प्रकरणाची चौकशी एसीबी आणि सीआयडीमार्फत व्हावी, अशी मागणीही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.