दुबईत श्रीदत्त जयंती महोत्सव साजरा
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : सातासमुद्रापार दुबईतदेखील श्रीदत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्णवाद ग्लोबल ह्युमन फाउंडेशन आणि इंस्पायर इव्हेंटस व दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्रपरिवार यांनी श्रीदत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. पालखी, पाळणा, पादुका पूजन, अभय सावंत यांची भजन संध्या व बालनाट्य ‘प्ररभू देखीला दास संतुष्ट जाहला’, ‘वारसा एक जपणूक’ हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे शनिवारी (ता. ३०) सद्गुरु यांच्या पादुकांचा पालखी सोहळा आणि दत्त जन्माचा उत्सव, त्यानंतर भजन व सामूहिक दत्त जाप, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत गार्गी सरोदे यांची भरतनाट्यमद्वारे गणेशवंदना झाली. कार्यक्रमाचे आयोजनकर्ते पुष्पेंद्र सरोदे, चंद्रशेखर जाधव, सह-सहकारी प्रसाद मांडे, धनंजय सरोदे, महेश प्रधान, संजय पाटील, योगेश कराड, राजेंद्र गोळेगावकर, अतुल गायकवाड, संतोष भस्मे, पूर्णवाद नारी फोरम या सर्वांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
श्री गुरुदेव दत्तांच्या तत्त्वज्ञानाचे निरूपण
श्री क्षेत्र पारनेर येथून आलेले पूर्णवादाचर्य-पूर्णवाद भूषण, ॲड. गुणेश पारनेरकर यांच्या निरूपणाने श्री गुरुदेव दत्तांच्या तत्त्वज्ञानाची सुंदर आणि मनाला भिडणारी मांडणी अनुभवायला मिळाली, हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. भार्गवी जाधव यांचे गायन आणि श्रीमंत ढोल-ताशा पथक यांची अप्रतिम अशी मानवंदना वादनाद्वारे देण्यात आली. यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.