मुंबई

निवडणूक लांबल्याने प्रभाग क्रमांक १२ मध्ये शांतता

CD

वाडा, ता. १ (बातमीदार) : नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये उद्या (ता. २) डिसेंबरला होणारी निवडणूक न्यायालयाने स्थगित केली आहे. त्यामुळे शहरातील या प्रभागात सोमवारी (ता. १) प्रचाराच्या आघाडीवर सामसूम होती. गेले अनेक दिवस प्रचारात रात्रीचा दिवस करणाऱ्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ही घोषणा झाल्यानंतर आज विश्रांती घेणेच पसंत केले. दररोज रिक्षाद्वारे होणाऱ्या प्रचाराला वैतागलेल्या वाडावासीयांनीही शांतता अनुभवली. या प्रभागात मात्र अध्यक्षपदाचे मतदान होणार आहे.

गेले आठ दिवस वाडा शहरात रॅली, पदयात्रा, घरोघरी जाऊन प्रचार, कॉर्नर सभा, आरोप-प्रत्यारोप, समाजमाध्यमांद्वारे होणारा प्रचार या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. अगदी उद्यावर मतदान आलेले असताना अचानक रविवारी (ता. १) भिवंडी न्यायालयाने एका प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने उत्साही उमेदवार हिरमुसले होते, मात्र प्रचाराला अवधी कमी आहे, अशी तक्रार करणाऱ्या या प्रभागातील कार्यकर्त्यांना आता अधिक कालावधी मिळाला आहे. आता पुन्हा कार्यकर्ते व हितचिंतकांना सांभाळावे लागणार असल्याने उमेदवार चिंतेत आहेत. या प्रभागात निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pollution: वाऱ्यामुळे प्रदूषणात घट! ‘एक्यूआय’मध्ये सुधारणा; कारवाईचाही हातभार

Maharashtra Police Bharti 2025 Update: भावी पोलिसांसाठी मोठी संधी; उमेदवारी अर्ज भरण्याबाबत झाला मोठा निर्णय

मुलीमुळे मैत्रीत दुष्मनी ! दिलीप कुमारांचा प्रेमाला विरोध पडला महागात; खास मित्राने मैत्रीच तोडली

Latest Marathi News Live Update : उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

श्रीराम नेनेंनी कधीच पाहिला नव्हता माधुरी दीक्षितचा सिनेमा, लग्नाबद्दल सांगताना धकधक गर्ल म्हणाली...' त्याना फक्त अमिताभ...'

SCROLL FOR NEXT